Marathi story अनोखे बंध भाग 11

 




दोन दिवस झाले तरी विरेनने रुद्राक्षला आद्याच सिलेक्शन झालं आहे हे कळवू दिलं नाही. त्याच मत होतं की लगेच तिचं सिलेक्शन झालं असं तिला कळवलं तर तिला डाऊट येऊ शकतो.


रुद्राक्ष,“ वीर अरे कधी कळवायचं आद्याला ती सिलेक्ट झाली म्हणून? दोन दिवस होऊन गेले आहेत.”


विरेन,“ आज मी त्या नर्स गीताला कळतो. मग तिला पुन्हा एकदा भेट आणि म्हण की या दोन दिवसात अजून दोन मुलींना भेटलो पण त्या बरोबर वाटल्या नाहीत म्हणून मग तुला सिलेक्ट केलं. तू अगदी माझ्या आजीला हवी तशी आहेस वगैरे वगैरे.” तो त्याला सांगत होता.


रुद्राक्ष,“ हो गुरू देव. आणि पुन्हा तिच्याशी मिटिंग कधी फिक्स करणार तुम्ही माझी?” 


विरेन,“ अजून दोन दिवसांनी.”


रुद्राक्ष,“ काय अजून दोन दिवसांनी? ” 


विरेन,“ हो कारण तुम्ही बिझी आहात ना सर. पण रुद्र तू तिला काय सांगून लग्न करायचं हे ठरवलंस. पण घरी काय सांगणार आहेस तू? याचा विचार केलास का? आणि आद्याला एक कोटी तू कोणत्या अकाउंटमधून देणार आहेस? कंपनी अकाउंटमधून तर तू इतकी मोठी रक्कम नाही काढू शकत. काका विचारणार ना? वरून आद्याच्या आईची ट्रीटमेंट एशियातील बेस्ट हार्ट सर्जनकडून करून घेणार म्हणतोस मी कालच त्या डॉक्टरच्या सेक्रेटरीशी संपर्क साधला होता. ते फक्त ऑपरेशन फी चाळीस लाख घेतात आणि अर्जंट असेल तर साठ लाख बाकी ट्रीटमेंटचा खर्च ही आहेच की म्हणजे कमीत कमी सत्तर लाख धरून चालायचं. म्हणजे दोन कोटीच्यावर रक्कम लागेल या सगळ्यासाठी. तू काय करणार आहेस?”


रुद्राक्ष,“ मी माझी चूक निस्तरायला कंपनी किंवा डॅडकडून  पैसे घेणार नाही वीर. तू विसरतोयस की मी गेल्या तीन वर्षांपासून पोतदार बिल्डर्सचा सी.ई.ओ आहे आणि मला एन्यूअल पॅकेज दोन करोडचे मिळते. तीन वर्षांचा सहा कोटी तसेच आहेत. माझा खर्च तर मी डॅडने दिलेल्या क्रेडिट कार्डवरच करत आलो आहे आजपर्यंत. माझ्याकडे माझ्या मेहनतीचे पैसे आहेत आणि मला त्याबद्दल कोणी विचारत नाही. त्यामुळे पैशाची काळजी तू करू नकोस. आणि घरी मी आणि आद्या गेल्या एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत. तिच्या आईचा हार्ट प्रॉब्लेम आहे आणि त्यांची सर्जरी पूर्वी  इच्छा होती लेकीचं लग्न पहायची म्हणून घाईत लग्न केलं असं सांगायचं. असं ही उलट घरात कळलं की आद्या मिडल क्लास आहे तर काकू,मॉम आणि आजी तिला डोक्यावर बसवणार आहेत.आपल्यात कोणी तिला त्रास देणारं नाही. सो डोन्ट व्हरी. ” 


विरेन,“ मला त्या आद्याची नाही तर आपल्या कुटूंबाची काळजी आहे. किती जहाल प्रकरण आहे ते पाहिलं आहेस ना. बरं पण तू तिच्याशी काँट्रॅक्ट मॅरेजच्या नावाखाली खरं लग्न करणार आहेस. आज ना उद्या तिला सत्य कळेल आणि एवढं सगळं करून ही तिने तुला माफ केलं नाही तर तू या लग्नात अडकशील याचा विचार केला आहे का तू?”


रुद्राक्ष,“ मला नाही वाटत की आद्या घरी कोणाला त्रास देईल. आणि  मुळात हे सगळं मी तिने मला माफ करावं या अपेक्षेने करतच नाही वीर. तिने मला माफ नाही केलं समज म्हणजे ती मला शिक्षा तर देणारच ना मग ती जी शिक्षा देईल ती मी निमूटपणे भोगणार. मी असा ही अडकणार आहे तसा ही अडकणारच आहे की. आणि इतका पुढचा विचार मी केला नाही वीर पुढच्या पुढे पाहता येईल.”


विरेन,“ ठीक आहे मी दोन दिवसांनी मिटिंग फिक्स करतो. पण आपण त्या एशियातील बेस्ट डॉक्टरला ऑपरेशनसाठी  बोलावले तर ती गीता. ती मेडीकल क्षेत्रातली आहे तिला माहीत असणार की त्या डॉक्टर सोडीबद्दल आणि त्याच्या फिबद्दल ही. ती आद्याला सांगणार नाही का?” त्याने पुन्हा शंका विचारली.


रुद्राक्ष,“किती प्रश्न रे तुझे. त्या डॉ.सोडीला त्याने चॅरिटी केली असं सांग म्हणून सांगायचं. इट्स सो सिंपल.” तो वैतागून म्हणाला.


विरेन,“ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे बाबा तुझ्याकडं. मी जातो आणि त्या गीताला कळवून मिटिंग फिक्स करतो.”


रुद्राक्ष,“ पण मला ही एक प्रश्न आहे वीर मला आद्याच्या नावाने ती काम करत असलेली कंपनी घ्यायची आहे. त्या कंपनीची नेट वर्थ तू काढून घे. जर दहा ते पंचवीस करोडपर्यंत असेल तर मी बँक लोन घेऊन ती घेऊ शकतो. मला वाटतं छोटीच कंपनी असावी. तू ते ही काम कर पण तुला सवड मिळाल्यावर.” तो विचार करत बोलत होता


विरेन,“ तू ऑल रेडी इतकं आद्यासाठी करत आहेस मग अजून तिच्यासाठी कंपनी घ्यायची गरज काय?” त्याने विचारलं.


रुद्राक्ष,“ कारण समज उद्या आद्याने  सत्य कळल्यावर माझ्या बाबतीत काही वेडं वाकडं पाऊल उचलले आणि त्याचा संशय घरी कोणाला आला तर पुढे तिचे भवितव्य सुरक्षित राहावे म्हणून.” 


विरेन,“ म्हणजे तुला जाणीव आहे की आद्या  तिला सत्य कळल्यावर तुझ्या बाबतीत  वेडं वाकडं पाऊल उचलू शकते तरी तुला तिच्याशी लग्न करून आगीत उडी मारायचीच आहे ना रुद्र?” तो काळजीने बोलत होता.


रुद्राक्ष,“ तू पुन्हा नको सुरू होऊस वीर; जा. मी सांगितलेली कामं कर जा.” तो म्हणाला.


विरेन,“ कर तुला काय करायचं ते.” तो म्हणाला आणि निघून गेला.

★★★


  विरेनने ठरल्या प्रमाणे गीताला रुद्राक्षने आद्याचे सिलेक्शन केले आहे आणि तो दोन दिवसात पुढचं ठरवायला तिला भेटेल. मिटिंग डिटेल्स तो तिला पाठवून देईल असं सांगितलं आणि गीता धावतच आद्याला भेटायला गेली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. 


गीता,“ आद्या चल जरा खाली चहा पिऊन येऊ.” ती म्हणाली.


आद्या,“ आई मी थोड्या वेळात येते तू आराम कर.” 



  ती म्हणाली आणि गीताबरोबर हॉस्पिटलच्या कँटीनमध्ये गेली.


आद्या,“काय गं! इतकं खुश व्हायला काय झालं?” तिने विचारलं.


गीता,“ त्या विरेनचा फोन आला होता आद्या. त्या रुद्राक्ष पोतदारने तुला त्याच्या कामासाठी सिलेक्ट केलं आहे.” ती आनंदाने म्हणाली.


आद्या,“ काय? वाटलं नव्हतं तो मला सिलेक्ट करेल. खूपच खडूस आणि एरोगंट वाटला तो मला. अशा माणसाबरोबर बायकोचे नाटक करायचं म्हणजे खूप अवघड आहे. त्यात त्याचा इगो बाप रे बाप सातवे असमान पे आहे. त्याला वाटतं की तो या जगात एकटाच मदनाचा पुतळा आहे.” ती तोंड वाकडं करत बोलत होती.


गीता,“ आद्या मी इथं तुझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन सांगत आहे आणि तू त्या सोल्युशनलाच नावं ठेवत आहेस. मी त्याच्याबद्दल सर्च केलं; आहेच गं तो तसा चिकना. त्याचा तो गोरा रंग, ती बॉडी आणि ते केशरी  रंगाचे डोळे आई गं! फोटोतच असा दिसतो तर प्रत्यक्ष कसा दिसत असेल? ” ती डोळे मिचकावून हसत  बोलत होती.


आद्या,“ आहे तसा तो देखणा पण आपल्याला काय त्याचे? एका वर्षाचा तर प्रश्न आहे. हा पण मी त्याच्यासमोर माझ्या अटी ठेवणार त्याला त्या मान्य असतील तर डिल फायनल करणार.” 


गीता,“ हो ते सगळं ठीक आहे तुझ्या अटी तो मान्य करणार कारण विरेन आधीच बोलला आहे की लग्नाचं नाटक करायचं आहे फक्त, तो पोतदार हात पण नाही लावणार तुला पण काकू आणि वेदान्तला काय सांगणार आहेस तू?” तिने गांभीर्याने विचारले.


आद्या,“ हेच की रुद्राक्ष पोतदार आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून आम्ही लग्न करत आहोत आणि एक वर्ष झालं की त्याच आणि माझं पटलं नाही म्हणून घटस्फोट घेतला.” ती दिर्घश्वास सोडत म्हणाली.


गीता,“ बरं तो विरेन तुला डायरेक्ट फोन करेल आता तुझा मोबाईल नंबर मी त्याला दिला आहे. त्या रुद्राक्षला भेट. तुझ्या अटी सांग पण शांतपणे सगळं हॅन्डल कर. कारण हा चान्स तुला पुन्हा भेटणार नाही. तू एक कोटी मध्ये काकूंची ट्रिटमेंट करून मुंबई सारख्या शहरात घर देखील घेऊ शकतेस.  तुझ्या पुढच्या बऱ्याच अडचणी सुटतील आद्या सो बी केअर फुल.” ती तिला समजावत होती.


आद्या,“ हो बाई मी सगळं डोकं शांत ठेवून करेन. सध्या तर मला आईची सर्जरी होणे महत्त्वाचे आहे. बाकी मग नंतर विचार करेन.” ती म्हणाली.


गीता,“ ऑल द बेस्ट!” ती म्हणाली.

★★★★


   दोन दिवस निघून गेले आणि पुन्हा आद्या आणि रुद्राक्ष त्याच कॅफेमध्ये भेटणार होते. वेळ संध्याकाळी सहाची ठरली होती. आद्या वेळेवर कॅफेत पोहोचली पण रुद्राक्ष मात्र आज ही  दहा मिनिटं उशिराच आला. तो आद्या ज्या टेबलवर बसली होती  तिथे गेला. त्याने घातलेल्या  सूटवरचा  कोट काढून खुर्चीला लावून बसत तो म्हणाला.


रुद्राक्ष,“ सॉरी आज पुन्हा मला उशीर झाला. एक बिझनेस मिटिंग होती. ती आटपून यायला वेळ लागला.”


आद्या,“ हो मला कळतंय तितकं तुम्ही बिझी असाल म्हणून सॉरी म्हणायची गरज नाही. पाणी प्या. वेटर एक कोल्ड आणि एक हॉट कॉफी.” ती त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास सरकवून वेटरला बोलावून म्हणाली.


रुद्राक्ष,“ओके तर मुद्यावर येवुयात. कॉंग्रेच्युलेशन यु आर सिलेक्टेड. मिस यादव एम आय राईट? तुम्हाला भेटल्यानंतर  ही मी  अजून दोन मुलींना भेटलो पण त्या मला पसंत पडल्या नाहीत. खूपच चिपकू टाईप वाटल्या त्या मला. त्यातल्या त्यात तुम्ही जेन्युअन वाटता म्हणून तुमचे सिलेक्शन केले.” तो बोलत होता.


आद्या,“ यस यु आर राईट. मी यादवच पण मला आद्या म्हणलेलं बरं वाटेल. थँक्स पण माझ्या ही काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य असल्या तर ही डिल फायनल करू.” ती शांतपणे म्हणाली.


रुद्राक्ष,“ अटी? कसल्या अटी?” त्याने भुवया उंचावून विचारले.


आद्या,“ मी तुमची बायको असल्याचे नाटक करणार आहे तर ते नाटक बेडरूमच्या बाहेर पर्यंतच  मर्यादित  असेल. बेडरूममध्ये आपण दोघे अनोळखी असू. तुम्ही मला बायकोचे नाटक करण्यासाठी एक कोटी देत आहात. त्यापेक्षा जास्त माझ्याकडून अपेक्षा करू नका. तुमच्यात आणि माझ्यात कोणता ही संबंध नसेल. मी काय म्हणतेय समजतंय ना तुम्हाला?” तिने विचारलं.


रुद्राक्ष,“ हो समजलं असं ही यु आर नोट माय टाईप. अजून काही अट?” त्याने तिच्याकडे पाहून तोंड वाकडं करत विचारलं.


आद्या,“ दॅट्स गुड. तुम्ही ही माझ्या टाईपचे नाहीत. अजून एक अट म्हणण्यापेक्षा विनंती समजा. माझ्या आईला हार्ट प्रॉब्लेम आहे. तिची ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार आहे ते ही या पाच दिवसात. तर काँट्रॅक्ट वगैरे होण्याआधी तुमच्याकडून मला पाच ते सात लाख मिळाले तर बरं होईल.”  ती म्हणाली.


रुद्राक्ष,“ हो चालेल. तुम्ही तुमच्या कामाचा मोबाला मागत आहात तर हक्काने मागा. तुमचा अकाऊंट नंबर मला पाठवा मी आजच दहा लाख ट्रान्स्फर करतो. तुमच्या अटी सांगून झाला असतील तर माझ्या ही काही अटी आहेत.”


आद्या,“ थँक्स आणि तुमच्या ही अटी आहेत? बोला!” तिने आश्चर्याने विचारलं.


रुद्राक्ष,“ हो माझ्या पण अटी असूच शकतात ना? त्यात आश्चर्य काय?  आय एम चार्मिंग मॅन तर तुम्ही पुढे जाऊन माझ्या प्रेमात पडलात आणि हे लग्नाचं नाटक आपण खरं करूयात असं म्हणालात तर ते जमणार नाही. नो हार्ड फिलिंग्स प्लिज आणि दुसरी अट तुम्ही पुढं जाऊन मी काँट्रॅक्ट मॅरेज केलं माझ्या घरच्यांना फसवलं तर मी त्यांना सत्य सांगते असं म्हणून मला ब्लॅकमेल करायचं नाही. तसं हे तुम्हाला मला लिखित स्वरूपात द्यावं लागेल.” तो डोळे बारीक करून बोलत होता.


आद्या,“ मी काय कोणाला ब्लॅकमेल करणारी वाटले का तुम्हाला? आणि प्रेम वगैरे गोष्टी माझ्यासाठी नाहीत. सगळं थोथांड  असतं ते. प्रत्येकाला बाईच शरीर हवं असतं फक्त कधी जबरदस्तीने तर कधी प्रेमाचं नाटक करून गोड बोलून. पुरुष जातच मादरxxx असते.” ती थोडी रागाने म्हणाली.


रुद्राक्ष,“ इतकं भडकायला काय झालं? आणि ह्या शिव्या वगैरे माझ्या घरी चालणार नाहीत. मी हे आधीच क्लिअर करतोय कारण खूप मुली माझ्या सारख्या हँडसम आणि श्रीमंत मुलाच्या मागे लागतात.” तो थोडा माजात म्हणाला.


आद्या,“ डू यु  रेयली थिंक दॅट यु आर हँडसम अँड चर्मिंग?” तिने तिरकस हसून एक भूवयी उडवून त्याला विचारलं.


रुद्राक्ष,“ का तुम्हाला वाटत नाही मी चर्मिंग आणि हँडसम? त्या दिवशी तर आ वासून मला बघत होतात. खरं बोलता ना तुम्ही कायम? मग सांगा ना आय एम हँडस ओर नॉट?” 



     तो त्याच्या खुर्चीवरून उठून टेबलवर हात ठेवून तिच्या जवळ जाऊन तिच्या डोळ्यात पाहत विचारत होता. आणि आद्याच्या नाकात त्याच्या सेंटचा वास शिरला. तो तिच्या इतक्या जवळ होता तिला ते सहन नाही झालं आणि  तिने रागाने त्याला जोरात ढकलून दिलं. अगदी सहज उभा असलेल्या रुद्राक्षचा त्यामुळे तोल गेला आणि त्याने टेबलवरचा सुटणारा हात पुन्हा आधारासाठी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि नेमका त्याचा हात तिथं असलेल्या फोकवर पडला. त्याच्या  हातातून रक्त येऊ लागले आणि तो लडखडून पडणार  इतक्यात त्याच्याही नकळत त्याच्या मागोमाग तिथे आलेल्या विरेनने त्याला धरलं. रुद्राक्ष थोडा सावरला आणि विरेनने त्याला नीट उभं केलं.


विरेन,“ किती लागलं रुद्र तुला! (त्याने त्याच्या खिशातला रुमाल काढला आणि रुद्राक्षच्या जखमेवर बांधला.) हाऊ डेअर यु. टू टच हिम? जंगली कुठली? रुद्र चल इथून. काही लोकांची लायकी नसते. तुला असल्या छपन्न मुली मिळतील. अँड यु  स्टे अवे.” तो रागाने तिच्यावर ओरडला आणि रुद्राक्षला जवळजवळ ओढतच तिथून घेऊन गेला.


    आद्या मात्र सुन्न होऊन तिथेच बसून होती. रुद्राक्षचा कोट मात्र तिथेच खुर्चीवर राहिला होता. विरेनने रुद्राक्षला गाडीत नेऊन बसवले. गाडीतला फक्ट एड बॉक्स काढला आणि रुमाल बांधलेली त्याची जखम सोडली. इतक्यात रुमाल रक्ताने भिजला होता. रुद्राक्ष मात्र सुन्न होऊन बसला होता.


विरेन,“ किती लागलं तुला रुद्र. मी म्हणालो होतो ना तुला की त्या मुलीपासून दूर रहा. ती मुलगी राक्षस झाली आहे रुद्र. बास आता हा वेडेपणा मी तुला आणखीन करू देणार नाही.” तो त्याच्या हाताला ड्रेसिंग करत बोलत होता. त्याने सुन्न होऊन बसलेल्या रुद्राक्षच्या हाताला पट्टी बांधली आणि तो त्याला तिथून घेऊन गेला.


  आद्याच्या अशा वागण्यामुळे रुद्राक्ष मागे हटेल का? आणि आद्या रुद्रच्या थोडं जवळ जाण्याने इतकी एग्रेसिव्ह का झाली असेल? 


©स्वामिनी चौगुले









Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post