Marathi love story अनोखे बंध भाग 24

    




    रुद्राक्षने आद्या काम करत असलेली कंपनी तिच्याच नावावर खरेदी केली होती. पण या बाबत आद्या मात्र अनभिज्ञ होती. रुद्राक्षने मात्र आता त्याने घेतलेले कर्ज फेडायचा ध्यास घेतला होता. त्याने त्याचा अमेरिकन मित्र मार्टिनला फोन केला.


रुद्राक्ष,“ हाय मार्टिन! हाऊ आर यु?” 


मार्टिन,“ हे रुद्रा व्हॉट्स अप मॅन? आय एम फाईन अँड व्हॉट अबाउट यु?”


रुद्राक्ष,“ आय एम अल सो गुड. मार्टिन यु हॅड गेव मी द ऑफर.  डू यु रिमेंबर दॅट?”


मार्टिन,“ येस. बट  यु डिड सेड नो।”


रुद्राक्ष,“ इफ sss युअर ऑफर इस स्टील ऑन दॅन आय एम इंटरेस्टड.” त्याने थोडं घाबरत विचारलं


मार्टिन,“ आय एम सॉ सॉरी! दॅट प्रोजेक्ट इस ऑल रेडी गोनिंग ऑन.”


रुद्राक्ष,“ ओ इट्स ओके.” तो निराश होऊन म्हणाला.


मार्टिन,“ वेट रुद्रा. आय हॅव न्यूव ऑफर फॉर यु. अवर कंपनी  गेटिंग वन ह्युज प्रोजेक्ट अँड फॉर दॅट उई निड डिझाईनर. अँड आय नो यु आर द बेस्ट.  यु कॅन डू धिस वर्क फ्रॉम युवर प्लेज बट  यु हॅव टू वर्क इन अवर ऑफिस हवर्स! कॅन यु डू दॅट?  उई आर पे टेन लॅक्स यु.एस.डी फॉर दॅट.”


रुद्राक्ष,“ मार्टिन! आय विल डू धिस प्रोजेक्ट. थँक्स बडी!” तो दहा लाख अमेरीकन डॉलर्स ऐकून भलताच खुश झाला होता.


मार्टिन,“ दॅट्स ग्रेट. यु हॅव टू कम वन्स इन अवर ऑफिस फॉर साइनिंग काँट्रॅक्ट अँड दॅन यु कॅन स्टार्ट द वर्क!.” तो म्हणाला.


रुद्राक्ष,“ ओके. यु टेल मी द डे! आय विल कम फॉर सायनिंग काँट्रॅक्ट.” तो म्हणाला आणि त्याच्याशी जुजबी बोलून त्याने फोन ठेवला.


  रुद्राक्ष भलताच खुश होता. त्याने बसल्या जागेवरून खुर्चीत बरोबर एक गिरकी मारली. त्याचा हा पोर खेळ सुरू होता तेंव्हा विरेन तिथे आला होता.


विरेन,“ लहान आहेस का रे तू? असले खेळ खेळायला.” त्याने हसून विचारलं.


रुद्राक्ष,“ लहान नाही पण मी खूप खुश आहे आज. वीर वीर आता मी डॅडकडून घेतलेले निम्म्यापेक्षा जास्त लोन एका झटक्यात फेडू शकतो.” तो खुश होत म्हणाला.


विरेन,“लॉटरी वगैरे लागली की काय तुला?”


रुद्राक्ष,“ तसंच समज हवं तर! तुला आठवतं मी अमेरिकेला आर्किटेक्चरचे शिक्षण घ्यायला गेलो होतो तेंव्हा मार्टिन  लुईस नावाचा तिथल्या खूप मोठ्या इंटस्ट्रीलिस्टचा मुलगा माझा मित्र होता म्हणजे अजून ही आहे. त्याच्या वडिलांनी मला डिग्री पूर्ण झाल्यावर जॉब ऑफर केला होता तो मी नाकारला. त्यानंतर ही त्यांनी मला एका प्रोजेक्टवर त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी ऑफर दिली होती. ती ही मी नाकारली पण आत्ता मला लोन फेडण्यासाठी गरज आहे म्हणून त्याला फोन केला होता मी तर त्याने मला एका मोठ्या प्रोजेक्टसाठी  दहा लाख यु.एस.डी डॉलर्सची ऑफर दिली आहे. अरे दहा लाख यु.एस.डी डॉलर्स म्हणजे इंडियन करंन्सीमध्ये एक्केचाळीस कोटी त्रेसष्ट लाख होतात. त्यासाठी मला फक्त एकदा अमेरिकेला जावे लागेल  काँट्रॅक्ट साइन करण्यासाठी.” तो सांगत होता.


विरेन,“ काय? एक्केचाळीस करोड? पण रुद्र आधीच तुझ्याकडं आपल्या कंपनीचे दोन प्रोजेक्ट आहेत आणि त्यात हे प्रोजेक्ट कसं मॅनेज करणार तू?” त्याने विचारलं.


रुद्राक्ष,“ वीर तुझ्या लक्षात येत नाही की आपल्या इथं रात्र असते तेंव्हा तिथे दिवस असतो म्हणजे आपल्या इथल्या रात्रीच्या वेळी त्यांचे तिथं ऑफिस सुरू असणार. मी करेन सगळं मॅनेज.” तो म्हणाला.


विरेन,“ म्हणजे तू दिवसा इथं ऑफिसमध्ये काम करणार आणि रात्री तिकडचे काम करणार मग आराम कधी करणार?” त्याने काळजीने विचारलं.


रुद्राक्ष,“होईल रे सगळं मॅनेज.” तो म्हणाला.

★★★★


     तो संध्याकाळी घरी आला. डिनरच्या वेळी त्याने विषय काढला.


रुद्राक्ष,“ डॅड तुला मार्टिन आठवतो का माझा अमेरिकेचा मित्र?”


विनीत,“ हो आठवतो ना त्याच्या वडिलांनी तुला जॉब ऑफर केला होता आणि मधे ही कोणत्या तरी प्रोजेक्टसाठी तुला विचारलं होतं. तू नाही म्हणालास.”


रुद्राक्ष,“ हो त्यानेच आणखीन एका प्रोजेक्टसाठी मला ऑफर दिली आहे.दहा लाख यु.एस.डी ची आणि मी ती घेतली आहे. मला एकदा अमेरिकेला जाऊन यावे लागेल काँट्रॅक्ट साइन करायला आणि प्रोजेक्ट डिटेल्स समजून घ्यायला. बाकी काम मी इथून करू शकतो.”


शरद,“ दहा लाख यु.एस.डी म्हणजे एक्केचाळीस करोड पेक्षा जास्त होतात की रुद्र! आणि तू ही ऑफर लोन फेडण्यासाठी घेतली आहेस बरोबर का?” त्यानी विचारलं.


रुद्राक्ष,“ हो. मी एका झटक्यात आपल्या कंपनीचे निम्म्याहून जास्त लोन फेडू शकतो. म्हणूनच ही ऑफर मी घेतली आहे.”


सविता,“ रुद्र काय गरज आहे हे सगळं करायची? आणि इतका वर्क लोड घेऊन तुझी तब्बेत बिघडली तर? ” ती काळजीने म्हणाली.


रुद्राक्ष,“ मी करेन सगळं मॉम.”


विनीत,“ रुद्र तुझं नवीन लग्न झालं आहे आद्याच्या ही तुझ्याकडून काही अपेक्षा असतीलच ना? तू असं काम काम करत बसलास तर तिला काय वाटेल?” ते म्हणाले आणि आद्या गडबडली


आद्या,“माझी काहीच हरकत नाही डॅड.” ती उसणे हसू आणत म्हणाली.


विनीत,“ परत याची तक्रार करायची नाही आ आद्या माझ्याकडे. तुम्हाला काय करायचं ते करा.” ते म्हणाले.



    सगळे झोपायला निघून गेले. विनीत बेडवर बसून त्याच्याच विचारात मग्न होता. तोपर्यंत सविता आली.


सविता,“ कसला विचार करतोयस इतका?”


विनीत,“ आपल्या रुद्रचा गं! आपल्या पोराने आपल्या अपेक्षे पेक्षा खूप मोठी झेप घेतली आहे असं वाटत नाही का तुला?” त्याने कौतुकाने विचारलं.


सविता,“हो ना! पण त्याला लोन फेडायचं आहे म्हणून तो हा सगळा उपद्याप करतोय. पण तू काय माझ्या पोराकडून खरंच घेणार आहेस का  त्याला लोन म्हणून दिलेले पैसे?” तिने रोखून पाहत विचारलं.


विनीत,“ वेडी आहेस का तू? मी घेईन का त्याच्याकडून पैसे? पण तो खूप मानी आहे सावी मी त्याचं मन राखायला त्याच्याकडून पैसे घेईन आणि त्याच्याच नावाने इन्व्हेस्ट करेन. शेवटी आपलं जे आहे ते त्याचंच आहे ना. पण मला ना आपल्या कार्ट्याला खूप अभिमान वाटतो सावी.” ते अभिमानाने म्हणाले.


सविता,“ हो पण या सगळ्या नादात त्याने तब्बेत बिघडवून नाही घेतली म्हणजे मिळवलं.” ती म्हणाली.


विनीत,“ लेट्स होप सो!” ते म्हणाले.

★★★★


तीन महिन्यांनंतर


     रुद्राक्ष  या कालावधीत एकदा अमेरिकेला जाऊन काँट्रॅक्ट साइन करून आला होता. दहा महिन्यात सगळं डिझाइन कंप्लिट करून द्यायचं होतं. त्यामुळे रुद्राक्ष रात्रंदिवस कामात गढून गेला होता. दिवसा ऑफिसमध्ये काम करायचं आणि रात्री  त्या प्रोजेक्टचे काम करायचं. पहाटे चारला किंवा पाचला झोपायचं आणि पुन्हा दहा वाजता ऑफिसला जायचं असं त्यांचं रुटीन सुरू होतं. आद्या तिच्या विश्वात रममाण होती. तिचं काम आणि आठवड्यातून दोन तीन वेळा आईला भेटायचं असं तिचं रुटीन सुरू होतं. तिला रुद्राक्षच मात्र आश्चर्य आणि कौतुक वाटायचं. करोडोच्या इस्टेटीचा वारस असणारा तो रात्रंदिवस मेहनत करत होता. एखादा असता तर ऐश करत फिरला असता पण हा जगा वेगळा आहे असं तिला वाटायचं. तिच्या मनात त्याच्याबद्दल आपसूकच आदर निर्माण होऊ लागला होता. त्यात गेल्या तीन महिन्यात त्याच तिच्याशी वागणं ही अदबशीर होतं त्याने कधीच त्याच्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. हा तो कधीकधी तिला पैशाचा माज दाखवायचा पण ते आवडायचं नाही आद्याला पण एकूण तिला रुद्राक्षबद्दल एक सोफ्ट कॉर्नर आणि आदर निर्माण झाला होता.


       आद्याला पहाटे पाच वाजता जाग आली. ती उठली तर रुद्राक्ष  लॅपटॉपवर कामच करत बसला होता.  तो 

 रात्रभर झोपलेला दिसत नव्हता.


आद्या,“ तुम्ही रात्रभर झोपला नाहीत असं दिसतंय असंच चोवीस तास काम करत राहिलात तर आजारी पडाल.” ती काळजीने म्हणाली.


रुद्राक्ष,“काही नाही होत. झालच बघ आता झोपतो. आठ वाजेपर्यंत.” तो म्हणाला. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तो झोपून गेला. आद्या उठली.


‛काय माणूस आहे हा. सगळं देवानं ऐतं दिलं आहे. एखादा असता तर ऐश केली असती पण हा डबल मेहनत करतोय. मॉम म्हणत होत्या कसली कंपनी विकत घेतली आहे याने आणि त्यासाठी स्वतःच्याच कंपनीतुन लोन स्वरूपात पैसे घेतले. डॅड, काका असेच देत होते तर नाही घेतले लोनचं मागितले आणि आता ते फेडायला कोणत्या तरी अमेरिकन कंपनीसाठी काम करत आहे.  त्या कामासाठी एक्केचाळीस करोड घेतले आहेत त्यांच्याकडून बाप रे! इतकी रक्कम तर मी स्वप्नात पण पाहिली नाही. रुद्र खूप मानी आहे आणि मेहनती ही, मी त्याला समजत होते तसा नाही हा. आणि या तीन महिन्यात त्याने माझ्याबरोबर एकदा ही आगळीक केली नाही त्याची मर्यादा नाही ओलांडली. त्याने मनात आणले असते तर तो माझा गैरफायदा घेऊ शकला असता आणि मी काय करू शकणार होते. त्याच्याबरोबर काँट्रॅक्ट केलं आहे मी ते ही कायदेशीर पण हा आधीच स्वतःची मर्यादा सोडून वागला नाही. हा आता सगळ्यांना फसवतोय तो लग्नाचं नाटक करून.  त्याला इतक्यात लग्न करायचं नाही हे पण कुठे तरी बरोबरच आहे ना कारण लग्न करून तो त्याच्या बायकोला वेळ कुठं देऊ शकणार आहे इतक्या कामातून. खरंच माझा खरा  नवरा जर इतका मेहनती  आणि स्वाभिमानी असता तर मला त्याचा अभिमानच वाटला असता. पण काय करणार रुद्राक्ष पोतदार माझा खोटा नवरा आहे. आद्या तो चंद्र आहे ज्याला तू फक्त लांबून पाहू शकतेस. त्याला हात नाही लावू शकत.’


   ती या सगळ्या विचारत अंघोळ करून बाहेर निघून गेली. रुद्राक्ष उठला त्याला आज लो फिल होत होते. सारखं मळमळल्या सारखं वाटत होतं. पण त्याने दुर्लक्ष केलं. तो नाश्ता करायला बसला पण त्याला तो ही करू वाटला नाही. थोडंस काही तरी खाल्ल्यासारखं केलं त्याने.


रत्नमालाबाई,“ छोटे सरकार काय सुरू आहे आजकाल तुमचं. नीट खातपीत नाही.” त्या त्याला रागावत म्हणाल्या.


रुद्राक्ष,“ आजी मी खाईन ऑफिसमध्ये काही तरी भूक लागल्यावर. आता मला भूक नाही.” 


    आद्याच्या कोरड्या मानत रुद्राक्ष विषयी आता  काही तरी फिलिंग्स निर्माण होऊ लागल्या होत्या. तिला त्याच्याबद्दल आदर वाटू लागला होता. रुद्राक्ष मात्र त्याच्या कामात व्यस्त होता. हे नदीचे दोन किनारे समांतर चालत असले तरी एकत्र नव्हते. पण आद्याच्या मनात निर्माण झालेला रुद्राक्ष विषयीचा भावनांचा ओलावा  अजून वाढणार की इथेच विरून जाणार होता. 

©स्वामिनी चौगुले




Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post