कथा आत्तापर्यंत
रुद्राक्षकडून एका बेसावध क्षणी आद्यावर बलात्कार होतो. पण अंधार असल्याने दोघांनी एकमेकांना पाहिलेले नाही. रुद्राक्षला मात्र त्याने केलेला गुन्हा रात्रंदिवस छळतो. तो आद्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती सापडत नाही. आणि एक दिवस योगायोगाने ती त्याच्यासमोर येते आणि तिच्या आवाजावरून तो तिला ओळखतो. चौकशी अंती आद्याच ती मुलगी आहे हे निश्चित होते. आद्याला आईच्या उपचारासाठी पैशाची गरज असते. आणि रुद्राक्षला ते कळल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त घेण्याचा मार्ग त्याला सापडतो. तो खोटं बोलून आद्याशी लग्न करतो. आद्याला वाटते हे लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण रुद्राक्ष तिच्याशी खरंच लग्न करतो. तो तिच्या आईवर योग्य उपचार करून घेतो. तसेच त्याला आता आद्याचे भविष्य सुरक्षित करायचं आहे म्हणून ती काम करत असलेली कंपनी तिच्या नावे खरेदी करायची आहे पण कोणाची ही मदत न घेता.
आता पुढे
रुद्राक्षने कर्जासाठी दोन तीन बँका आणि फाईनान्स कंपन्यांमध्ये प्रयत्न सुरू केले. पण त्याला कर्ज मागताना पाहून मार्केटमध्ये सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक असं मार्केटमध्ये कर्ज मागत आहे म्हणल्यावर मार्केटमध्ये चर्चा तर होणारच होती. जवळ जवळ एक आठवडा रुद्राक्ष सत्तर करोडचे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि एक बँक त्याच्या पगारातून हफ्ता घेऊन त्याला कर्ज द्यायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी रुद्राक्ष फॉर्मेलिटी पूर्ण करायला जाणार होता. तो समाधानाने ऑफिसमध्ये पोहोचला तर विनीत आणि शरद त्याच्या केबिनमध्ये त्याचीच वाट पाहत होते. त्या दोघांना रुद्राक्ष लोन घेत असल्याची माहिती मार्केटमधून मिळाली नसती तर नवलच शेवटी त्यांना ही बातमी कळाली होती.
विनीत,“ रुद्र हे आम्ही काय ऐकतोय? तू मार्केटमधून लोन घेत आहेस?” त्यांनी रागाने विचारलं.
रुद्राक्ष,“ हो! मला एक कंपनी विकत घ्यायची आहे डॅड त्यासाठी मी लोन घेत आहे. आणि एक बँक मला लोन द्यायला तयार आहे. मी माझ्या पगारातून हफ्ता लावून लोन घेत आहे.” त्याने सांगितलं.
शरद,“तुला कंपनी विकत घ्यायची आहे तर मग आपण घेऊ की त्यासाठी लोन घ्यायची गरज काय? आपण तुझ्यासाठी अशा दहा कंपन्या घेऊ शकतो.” तो म्हणाला.
रुद्राक्ष,“ नाही काका मला माझ्या स्वतःच्या जीवावर ही कंपनी घ्यायची आहे. प्लिज ना मला घेऊ द्या ना लोन!” तो विनंती करत म्हणाला.
विनीत,“ डोकं फिरलं आहे का तुझं? हे इतकं मोठं बिझनेस एंपायर कोणासाठी उभं केलं आहे? आम्ही वर जाताना उरावर घेऊन जाणार आहोत का हे सगळं? अरे हे सगळं तुझं आणि शरूचेच आहे ना?” ते त्याच बोलणं ऐकून चिडून म्हणाले
रुद्राक्ष,“ हो डॅड हे सगळं माझं आणि शरूचचं आहे पण मला स्वतः काही तरी करायचं आहे. स्वतःला सिद्ध करायचं आहे. प्लिज डॅड ट्राय टू अंडरस्टॅंड!” तो आता केविलवाणा होत म्हणाला.
विनीत,“ शरद याला समजावं. याला नेमकं काय सिद्ध करायचं आहे?”
शरद,“ बेटा रुद्र तू स्वतःला आधीच सिद्ध केलं आहेस. आपल्या सोसायटीतील मुलं जेंव्हा व्यसनं आणि मुलींच्या मागे पैसे उधळत फिरत होती तेंव्हा तू अभ्यास करून गोल्ड मेडल मिळवलंस ते ही अमेरिकेत जाऊन. तुझ्याबरोबरची मुलं अजून ही उनाडक्या करत फिरतात आणि तू ऑफिस जॉईन करून या तीन चार वर्षात आपल्या बिझनेसला किती फायदा करून दिलासा. उई आर प्राउड ऑफ यु बेटा. अरे अमेरिकेत तुला किती मोठी ऑफिर मिळाली होती ती तू नाकारून परत आलास अजून यापेक्षा मोठं काय असू शकत?तुझा आम्हाला अभिमान आहे. तू स्वतःला सिद्ध करून झालं आहे. आणि मग हे कसलं खुळ घेऊन बसला आहेस डोक्यात बच्चा?” ते त्याला समजावत होते.
रुद्राक्ष,“ हो काका पण मला आद्यासाठी ती काम करत असलेली कंपनी विकत घ्यायची आहे पण ती माझ्या स्वतःच्या पैशानेच.” तो बोलून रिकामा झाला.
विनीत,“ काय करू मी तुझं रुद्र? हे आधी का नाही सांगितलं. मग घे की कंपनी सगळं तुझंच आहे ना?” ते आता वरमून म्हणाले.
रुद्राक्ष,“पुन्हा तेच मी म्हणालो ना मला स्वतः च्या पैशाने घ्यायची आहे कंपनी? कळत नाही का तुम्हाला?” आता तो चिडून म्हणाला आणि निघून गेला. विरेन ही त्याच्या मागोमाग गेला.
विनीत,“ काय करायचं शरद या पोराचे? पण अभिमान पण वाटतो कार्ट्याचा.” ते हसून म्हणाले.
शरद,“ हो ना. इथं आजकालच्या पोरांना सगळं आयतं हवं असतं आणि याला मिळतंय तर नको वाटतंय. असो आपण एक सुवर्णमध्य काढू शकतो दादा ज्याने याचा स्वाभिमान पण दुखावला जाणार नाही आणि याला लोन फेडायचं बर्डनपण येणार नाही.” ते काही तरी विचार करून बोलत होते.
★★★★
रुद्राक्ष गाडीत बसला त्याच्या मागे पळत येऊन विरेन ही गाडीत बसला.
रुद्राक्ष,“ मला एकट्याला राहायचं आहे वीर. जा तू.” तो चिडून म्हणाला.
विरेन,“मी तुझा बॉडी गार्ड आहे मग तुझ्याबरोबर येणार आणि तुमच्या भांडणात मला माझी नोकरी नाही गमवायची. शरद सरांना कळलं की मी तुला एकट्याला तू रागात असताना सोडलं आहे तर ते मला काढून टाकतील नोकरीवरून.” तो म्हणाला आणि रुद्राक्षने गाडी सुरू केली.
रुद्राक्ष चिडला असेल किंवा अपसेट असेल तर तो एक तर घरी जाऊन गॅलरीतल्या त्याच्या आवडत्या खुर्चीवर तासंतास एकटाच बसायचा किंवा मग शहरा बाहेर असलेल्या एका शांत तळ्याच्या ठिकाणी जाऊन बसायचा. आज त्याने तळ्याच्या दिशेने गाडी नेली आणि त्या शांत तळ्याच्या काठी जाऊन बसला. सिगारेट काढून पेटवली. हवेत सिगारेटचे वलय सोडत तो शांत बसून होता. विरेन त्याच्या शेजारी बसला होता. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते.
रुद्राक्ष,“ वीर कसं समजावू मी यांना मला माझ्या पैशाने ती कंपनी घ्यायची आहे. मला ज्याची भीती होती तेच झालं डॅडला आणि काकाला हे लोन प्रकरण कळलं. आता डॅडने मनात आणलं तर तो मला कुठूनच लोन मिळू देणार नाही. आता काय करू मी?” तो टेन्शनमध्ये बोलत होता.
विरेन,“रुद्र अरे असं काही होणार नाही. विनीत सर तुझे वडील आहेत ते तुला दुखावणार नाहीत रे. आणि असं ही उद्या तू फॉर्मेलिटी पूर्ण करणार आहेस त्यानंतर तुला लोन मिळेल ही. सो डोन्ट व्हरी.” तो त्याला समजावत होता.
रुद्राक्ष,“लेट्स होप सो!” तो म्हणाला.
विरेन,“ मग चला आता घरी.” तो म्हणाला.
रुद्राक्ष,“ थांब जरा. आणि आपण बाहेरच डिनर करू मग घरी जाऊ. काय आहे आज डायनींग टेबलवर शीतयुद्ध होऊ शकते म्हणून.” तो हसून म्हणाला.
दोघं अजून थोडावेळ तिथेच बसले आणि बराच वेळ भटकत राहिले. जेवायची वेळ झाल्यावर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचले. आधीच रुद्राक्षने त्याच्या आईला फोन करून तो डिनरला घरी येणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे विनीतला ही कळलेच होते.
तो रात्री दहा वाजता घरी आला तर त्याची आई त्याचीच वाट पाहत बसली होती.
सविता,“ रुद्र फ्रेश हो आणि स्टडीमध्ये ये.” त्या म्हणाल्या.
रुद्राक्ष,“ आद्या कुठे आहे?”
सविता,“ ती तुमच्याच रूममध्ये आहे. आणि डिनर बाहेर करायचा नाही इथून पुढे. तुझं लग्न झालं आहे आता आणि घरचा नियम विसरलास का? डिनर सगळ्यांनी एकत्र करायचा तो.” ती गंभीरपणे बोलत होती.
रुद्राक्ष,“ सॉरी मॉम! आणि मी आलोच.” तो म्हणाला आणि निघून गेला. तो रुममध्ये गेला तर आद्या झोपली होती.
रुद्राक्ष फ्रेश झाला आणि स्टडीमध्ये गेला. तर रत्नमालाबाईपासून सगळे तिथे जमा होते.
रत्नमालाबाई,“ मी हे काय ऐकतेय रुद्र तू मार्केटमधून लोन घेत आहेस?” त्यांनी दरडावून विचारलं.
रुद्राक्ष,“ हो. तुला तर सगळंच कळलेलं दिसतंय.” तो विनीतकडे तिरकस पाहत म्हणाला.
सविता,“ तुला कंपनी विकत घायची आहे तर मग आपल्या….” त्यापुढे बोलणार तर रुद्राक्ष त्यांचे बोलणे मध्येच तोडत म्हणाला.
रुद्राक्ष,“ डॅड आणि काकांनी सगळंच सांगितलं असेल ना तुम्हाला?मला तेच तेच नाही बोलायचं अजून!” तो चिडून म्हणाला.
केतकी,“ टिटू बच्चा ताई काय म्हणतेय ते नीट ऐकून तरी घे. उगीच चिडचिड नको करून ना.” त्या समजावत म्हणाल्या आणि रुद्राक्ष वरमला.
शरद,“ तुझा स्वतःच्या पैशाने कंपनी विकत घ्यायचा हट्टच आहे ना. मग बाहेरून लोन घेण्यापेक्षा तू आपल्या कंपनीकडून लोन घे. असं ही तू आपल्या कंपनीत एंप्लॉई आहेस. सी.ई.ओ ही तुझी पोस्ट आहे तर ती पोस्ट लक्षात घेता आणि तुझा पगार पाहता आम्ही तुला लोन देतो. कंपनीच्या नियमानुसार हे शक्य आहे. आणि हे कर्ज आम्ही तुझ्या पगारातून हप्त्याने फेडून घेऊ. उद्या आपल्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये ये प्रोसिजर पूर्ण झाली की तुझ्या अकाउंटमध्ये सत्तर करोड डिपॉझिट होतील.” ते म्हणाले.
रुद्राक्ष त्यांचं बोलणं ऐकून विचारात पडला. तो थोडावेळ शांतच होता. ते पाहून विनीत मात्र उचकला.
विनीत,“ कसला विचार करतोस रे कार्ट्या इतका उचकट की तुझं तोंड.”
सविता,“ किती चिडचिड करताय ओ त्याच्यावर ,थांबा की जरा.” ती त्याला समजावत म्हणाली.
रत्नमालाबाई,“ बोल रुद्र काय म्हणणं आहे तुझं?” त्यांनी शांतपणे विचारलं.
रुद्राक्ष,“ ठीक आहे मी तयार आहे पण मी पूर्ण लोन फेडणार ते ही व्याजासह.” तो विचार करत म्हणाला.
विनीत,“ हो फेडा ना! खूप मोठे झाले आहेत साहेब आता.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.
शरद,“ काय रे दादा त्याला असं म्हणतोस. जा तू बच्चा आद्या वाट पाहत असेल ना तुझी.” तो म्हणाला.
रुद्राक्ष,“ आणखीन एक आद्याला यातलं काही माहीत नाही आणि तिला कळलं नाही तर बरं होईल कारण ती काम करते त्या कंपनीत. तिचा गैरसमज व्हायला नको.” तो म्हणाला.
केतकी,“ नाही कळणार तिला काही तू जा. आपला टिटू मोठा झाला ताई उई आर प्राउड ऑफ यु बच्चा.” ती त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.
रुद्राक्ष,“ काकू तूच मला समजू शकतेस या घरात हे सगळे मला वेडा समजतात.” तो तोंड फुगवून म्हणाला.
विनीत,“ नाही तू अतिशहाणा आहेस.”
रत्नमालाबाई,“ विनू खूप झालं. त्याला आता घालून पाडून बोलशील तर बघ. उलट केतकी म्हणाली तसं आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. तू जा बेटा.” त्या दरडावून म्हणाल्या. आणि रुद्राक्ष निघून गेला.
त्याने झोपायचा प्रयत्न केला. पण त्याला काही झोप लागत नव्हती. त्याचे लक्ष सोफ्यावर झोपलेल्या आद्याकडे गेले. ती अगदी गाढ झोपली होती. तो उठला आणि गॅलरीत गेला. आराम खुर्चीवर बसून सिगारेटचे झुरके सोडत तो विचार करत होता.
‛ डॅड माझ्यावर वर वर चिडला आहे असं दाखवतो पण त्याच्या डोळ्यात मला माझ्या विषयीचा अभिमान दिसतो. काका, काकू, मॉम आणि आजी सगळ्यांनाच माझा अभिमान आणि माझ्या वागण्याचे कौतुक वाटते. पण जेंव्हा त्यांना कळेल की मी आद्यावर बलात्कार केला आहे तेंव्हा या कौतुकाची जागा तिरस्कार घेईन. त्यांना माझी लाज वाटेल. आद्या किती गाढ झोपली आहे. माणूस निरपराध असतो तेंव्हा त्याला गाढ झोप लागते अपराधाचे ओझं घेऊन गाढ झोप कधीच लागू शकत नाही. असो उद्या लोनची प्रोसिजर पूर्ण करतो मी. आणि मार्टिनला उद्या फोन करून विचारतो त्याची डिल ऑन असेल तर चार महिन्यात लोन निल होईल.’
तो बराच वेळ तिथे बसून राहिला आणि मध्य रात्री कधी तरी येऊन बेडवर झोपला.
रुद्राक्षला त्याचा गुन्हा आतून पोखरत होता आणि त्या गुन्ह्याचे ओझे काही प्रमाणात का होईना हलके करण्याचा या सगळ्यातून तो प्रयत्न करत होता. आद्या मात्र या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होती.
©स्वामिनी चौगुले
सणामुळे कथेचे भाग यायला वेळ लागला. त्याबद्दल मी दिलगीर आहे पण इथून पुढे कथेचे भाग सुरळीत पोस्ट होत राहतील.
