Marathi love story अनोखे बंध भाग 21

   



    रुद्राक्षला  आद्याचे भवितव्य लवकरात लवकर सुरक्षित करायचे होतं. आणि त्याचा फक्त एकच मार्ग त्याला दिसत होता तो म्हणजे तिच्या नावावर एखादी कंपनी खरेदी करणे. आणि मग कंपनीच खरेदी करायची असेल तर ती काम करत असलेली कंपनी खरेदी करणे त्याला सगळ्याच बाजूने सोयीस्कर वाटत होते. म्हणून त्याने आधीच आद्या काम करत असलेल्या कंपनीची नेट वर्थ काढायला विरेनला सांगितलं होतं. त्याप्रमाणे विरनने त्या कंपनीची नेट वर्थ काढून आज आणली होती.


विरेन,“ मे आय कम इन? ” त्याने रुद्राक्षच्या केबिनच्या दारावर नॉक करत विचारलं.


रुद्राक्ष,“ येस. अरे वीर ये ना बाबा. तुझ्यासाठी या फॉर्मेलिटी नाहीत.” तो हसून म्हणाला.


विरेन,“ फ्रेंड वगैरे ऑफिस बाहेर बाबा इथं तू माझा बॉस आहेस.” तो म्हणाला.


रुद्राक्ष,“ बरं काय काम होतं? बोल बाबा माझ्याकडे ऑल रेडी खूप कामं आहेत.” त्याने विचारलं


विरेन,“ तूच दिलेलं काम पूर्ण करून आलो आहे. तू म्हणाला होतास ना आद्या काम करते त्या कंपनीची नेट वर्थ काढून आण. तर ती आणली आहे आणि त्या कंपनीच्या मालकाशी देखील बोलणे झाले आहे माझे. आणि गुड न्यूज इस तो कंपनी विकायला तयार आहे.” तो सांगत होता.


रुद्राक्ष,“ ओ दॅट्स ग्रेट! बोल किती नेट वर्थ आहे त्या कंपनीची?” त्याने खुश होत विचारलं.


विरेन,“ इतकं खुश होऊ नकोस. कारण त्या कंपनीची नेट वर्थ आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त तर आहेच आणि तो कंपनीचा मालक वीस टक्के जास्त पैसे मागत आहे कंपनी विकण्यासाठी. कंपनी आहे पन्नास करोडची आणि तो मागतोय सत्तर करोड. हा तू विनीत सरांकडून पैसे घेऊन ती कंपनी विकत घेऊ शकतोस पण त्यांना इतके जास्त पैसे देऊन कंपनी विकत घेणे पटेल का? आणि आपला कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे आणि ती फायनान्स कंपनी आहे. ती कंपनी कोण आणि कशी सांभाळणार?” तो बोलत होता.


रुद्राक्ष,“ एक तर मला हे सगळं डॅडकडून पैसे घेऊन नाही करायचं. मी केलेलं पाप मीच निस्तारणार! आणि कंपनी विकत घ्यायची पण चालवायला त्याच ओनरकडे ठेवायची त्याला पगार देऊन फक्त आपण लक्ष ठेवायचं. सत्तर करोड म्हणजे माझ्या एकट्यासाठी ही खूप मोठी रक्कम आहे वीर. मी मार्केटमधून कर्ज घेईन आणि माझ्या पगारातून हप्ता लावेन. माझा अमेरिकेचा मित्र आहे तो कधीचा मला मदत कर म्हणतो त्याला एक मोठे प्रोजेक्ट मिळणार आहे त्या संदर्भात पण मी त्याला टाळलं होतं. बेस्ट थिंक इस इथंच म्हणजे भारतात बसून त्याला कामात मदत करू शकतो. त्याची डिल ऑन आहे का पाहतो मी? जर त्याची डिल ऑन असेल मी हे कर्ज दोन महिन्यात फेडू शकतो. आजच रात्री मी त्याला विचारतो आणि उद्या मार्केटमध्ये लोन संदर्भात चौकशी सुरू करतो. तू त्या कंपनीच्या मालकाला डिल पक्की म्हणून कळवून टाक.” तो बोलत होता.


विरेन,“ पण रुद्र इतकं सगळं करायची खरंच गरज आहे का? अरे ऑल रेडी तू  आद्याला सत्तर लाख दिले आहेस पुढे तीस लाख देणार आहेस एक कोटी तर इथेच झाले वरून तिच्या आईच्या उपचारांचा सत्तर लाख खर्च तूच केलास. म्हणजे एक कोटी सत्तर लाख इथेच झाले. वरून तिच्याशी लग्न करून तिला घरात आणून बसवलं आहेस. तिची किंमत आहे का तितकी?” तो म्हणाला आणि रुद्राक्षने रागाने उठून त्याची कॉलर धरली.


रुद्राक्ष,“ तू मित्र आहेस माझा म्हणून नाही तर तुला उभा चिरला असता वीर! कोणत्या ही मुलीच्या शिलाची किंमत आपण कधीच लावू शकत नाही. मी गुन्हेगार आहे तिचा आणि मी तिच्यासाठी किती ही केलं तरी कमीच आहे. आणि ती माझी बायको आहे आता विसरू नकोस? म्हणजे तुझी मालकीण! आणि तुझ्या बहिणीवर कोणी अत्याचार केला असता तर किती किंमत लावली असतीस तिच्या शिलाची? बोल ना?” तो रागाने लाल बुंद होऊन बोलत होता. विरेन ही चिडला त्याने त्याची कॉलर सोडवून घेतली आणि रागाने म्हणाला.


विरेन,“ माईंड युवर टंग! माझ्या बहिणीला इथं मध्ये आणायचं कारण नाही.”


रुद्राक्ष,“ का आला ना राग? मग आद्या ही कोणाची तरी बहीण आहे हे लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ती सौ.आद्या रुद्राक्ष पोतदार आहे हे विसरायचं नाही. गेट आऊट!” तो ओरडला. विरेनला त्याची चूक कळली. त्याची मान शरमेने खाली गेली. आणि तो केबिनमधून निघून गेला.


   रुद्राक्ष बराच वेळ रागाने धुमसत होता. तरी त्याने स्वतःला शांत केले आणि कामत गुंतवून घेतले. संध्याकाळी रुद्राक्षने त्याच्या सेक्रेटरीला विरेनला दोन दिवसांची सक्तीची विश्रांती दिली आहे आत्ताच्या आत्ता घरी जा असा निरोप द्यायला सांगितला. विरेन ऑफिसमध्ये वाद नको म्हणून निघून गेला. रुद्राक्ष अपसेट होता. तो घरी पोहोचला. आद्या त्याच्या आधीच घरी आली होती आणि ती आजीशी गप्पा मारत किचनमध्ये काही तरी करत होती.



रत्नमालाबाई(आजी),“ आलास रुद्र! जा फ्रेश हो. आद्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन जा. बघ आज आद्या डिनरमध्ये पुलाव करणार आहे.” त्या सांगत होत्या. आणि रुद्राक्ष मान हलवून निघून गेला.


   तो फ्रेश होऊन आला आणि आद्याने त्याच्या हातात कॉफी मग दिला.


रुद्राक्ष,“ हे सगळं करायची काही गरज नाही.” तो चिडून म्हणाला.


आद्या,“ एक्स क्युज मी! असं बाहेरचा राग माझ्यावर काढायला मी काय तुमची खरी बायको नाही. आणि मला ही हौस नाही हे सगळं करायची. पण बायको असल्याचे नाटक तर करावेच लागेल ना.” ती फणकाऱ्याने म्हणाली.


रुद्राक्ष,“ सॉरी. बरं मी गॅलरीत  आहे.” तो कॉफी मग घेऊन गेला आणि गॅलरीत असलेल्या त्याच्या आवडत्या  आराम खुर्चीत बसला. आद्या कॉफी देऊन बाहेर निघून गेली.


    आजी हॉलमध्ये  बसल्या होत्या. तोपर्यंत विरेन तिथे आला.


विरेन,“ आजी रुद्र कुठे आहे?” 


रत्नमालाबाई,“ त्याच्या रूममध्ये आहे जा.” त्या म्हणाल्या .


   विरेन वर रुद्राक्षच्या रूममध्ये गेला त्याला माहित होतं की रुद्राक्ष गॅलरीत असेल. तो सरळ गॅलरीत गेला. तर रुद्राक्ष सिगारेटच्या धुराचे वलय सोडत आराम खुर्चीवर शून्यात नजर  लावून बसला होता. विरेन त्याच्याजवळ गेला. रुद्राक्षने त्याला पाहिले आणि  तो रागाने म्हणाला.


रुद्राक्ष,“ का आला आहेस तू इथं? तुला दोन दिवसांची सक्तीची रजा दिली आहे ना?”


विरेन,“ सॉरी ना रुद्र.मला माहित आहे. मी बोलण्याच्या ओघात जास्तच बोलून गेलो. पण मला तुझी काळजी वाटते एक तर ती शूर्पणखा तिला सत्य समजेल तेंव्हा काय करेल? याची भीती वाटते मला. ” तो खाली मान घालून बोलत होता.


रुद्राक्ष,“ बरं बाबा असू दे. आणि आय  एम अल सो सॉरी! मी तुझी कॉलर धरायला नको होती.” तो सिगारेटचे एक वलय नाका तोंडातून सोडून त्याच्या हातात सिगारेट देत म्हणाला.


विरेन,“ इट्स ओके. आणि मग माझी सक्तीची रजा कॅन्सल कर ना.” तो त्याला  मस्का मारत म्हणाला.


रुद्राक्ष,“ तू ना निर्लज्ज आहे एक नंतर.” तो हसून म्हणाला.


विरेन,“ काय करणार तुझ्याशिवाय करमत नाही मला आणि आता मी जेवण करून जाणार. बिर्याणी ऑर्डर करतो सगळ्यांसाठी.” तो बोलत होता.


रुद्राक्ष,“ हो ना तू तर माझा पिच्छा असा सोडणार नाहीस. आणि मला चांगलं माहीत आहे की तू आता जेवल्या शिवाय जात नसतोस.” तो पुन्हा हसून म्हणाला.


  दोन मित्रांमध्ये झालेले भांडण मिटले होते. ते तर मिटणारच होते. पण रुद्राक्ष मार्केटमधून कर्ज घेत आहे हे जेंव्हा विनीत आणि शरदला कळेल तेंव्हा ते कसे रियाक्ट होणार होते? हे मात्र येणारा काळच ठरवणार होता.


©स्वामिनी चौगुले 


  

 

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post