Marathi story अनोखे बंध भाग 9

    





  रुद्राक्षने दुसऱ्या दिवशी विरेनला केबिनमध्ये बोलावून घेतले. आद्या विषयी काय करायचं त्याचा त्याबद्दल पूर्ण निर्णय झाला होता आणि त्याने सगळं काही ठरवलं होतं. विरेन त्याच्या केबिनमध्ये आला.


विरेन,“ बोल इतकं घाईत का बोलावून घेतलंस?”


रुद्राक्ष,“ आद्याविषयी काय करायचं त्याबद्दल माझा निर्णय झाला आहे.”


विरेन,“ इतक्या लगेच? दोन दिवस विचार करणार होतास ना तू?”


रुद्राक्ष,“ हो पण झाला माझा निर्णय. ऐक मी एक प्लॅन बनवला आहे. फेक काँट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स बनवून घे. लक्षात ठेव पेपर्स फेक असावेत. मी आद्याशी लग्न करणार आहे पण तिला असं भासवायचं की हे काँट्रॅक्ट मॅरेज आहे. मी काँट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी तिला पैसे ऑफर करेन आणि तिला आता पैशाची गरज आहे तर ती होईल तयार. ती ज्या कंपनीत काम करते ती कंपनी तिच्याच नावावर विकत घ्यायची. दुप्पट नाही तर चौपट पैसे ऑफर कर. तिच्या आईच्या सर्जरीसाठी एशियातील बेस्ट हार्ट सर्जन बोलवाचा. तिच्या भावाचे काय सुरू आहे ते ही बघ. तू फक्त गीताच्या थ्रू आद्यासमोर माझ्याशी काँट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी एक करोडोची डिल तिच्यासमोर ठेव आणि मला तिला भेटायला सांग बाकी मी पाहून घेईन. माझ्यामुळे तिचे आयुष्य बरबाद झाले तर ते सावरण्याची जबाबदारी ही माझीच आहे.”तो शांतपणे बोलत होता.


विरेन,“ आर यु आऊट ऑफ इवर माईंड? आरे तिला मदत करण्यासाठी तिच्याशी लग्न करायची गरज काय? अशी ही आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून तिला आपण मदत करू शकतो ना? मग हे सगळं कशासाठी रुद्र?” त्याने चिडून विचारलं


रुद्राक्ष,“ वीर तिचा गुन्हेगार मी आहे आपली ट्रस्ट नाही जर मी तिची लाईफ बरबाद केली आहे तर ती पुन्हा सावरनं देखील माझीच जबाबदारी आहे.”


विरेन,“ तुझ्या लक्षात येतंय का? तू काय बोलत आहेस? अरे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेस ना ती किती अग्रेसिव्ह आहे. तिला जेंव्हा हे कळेल की तूच तिच्यावर बलात्कार केला आहे तेंव्हा ती तुझं काय करेल याचा विचार आहे का? अरे नुसती वाघीण असती तरी परवडलं असतं पण ही आग आहे रुद्र आग! तिच्याजवळ जशील तर होरपळून निघशील. आगीशी नको खेळून रुद्र! ऐक माझं तिला आपण हवी ती मदत करू. हवं तर तिचं लग्न एखादा चांगला मुलगा पाहून करून देऊ पण तू तिच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे.” तो त्याला कळकळीने सांगत होता.


रुद्राक्ष,“ वीर ती अशी कोणामुळे झाली? माझ्याच मुळे ना? आणि कोण करणार तिच्याशी लग्न जर  तिच्यावर बलात्कार झाला आहे हे कळल्यावर? आणि कोणी केलंच तिच्याशी लग्न तर तो तिला नीट वागवेल याची काय गॅरंटी? वरून ही म्हणजे आगडोंब आहे कोण सहन करणार हिला? ज्याने हा आगडोंब तयार केला त्यानेच तो अंगावर घेतलेला बरा. आणि तिला सत्य तर मीच सांगणार आहे एक दिवस मग ती मला जी शिक्षा देईल ती मला मान्य आहे. रोज प्रायश्चिताच्या अग्नीत जळण्यापेक्षा, मला तिच्या रागाच्या आगीत जळायला आवडेल.” तो गंभीरपणे बोलत होता.


विरेन,“ रुद्र प्लिज ऐक ना माझं! नको वागूस असा याचे परिणाम काय होतील याचा विचार कर. अरे ती पोरगी जीवसुद्धा घेऊ शकते तुझा! तिच्या डोळ्यात मी आग पाहिली आहे.” तो काळजीने बोलत होता.


रुद्राक्ष,“ जीवच घेईल ना? मग मी द्यायला तयार आहे. माझ्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून.” तो हसून म्हणाला.


विरेन,“ रुद्र हा शुद्ध वेडेपणा आहे.”


रुद्राक्ष,“ मी वेडा आहे असं समज आणि जा आता पुढच्या दोन दिवसात तिची आणि माझी भेट झाली पाहिजे. तोपर्यंत मी फेक पेपर्स बनवून घेतो.” तो म्हणाला आणि विरेन नाईलाजाने निघून गेला.

★★★


   विरेन दुपारच्या वेळी पुन्हा कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने गीताला पुन्हा गाठले. गीता ही जणू त्याचीच वाट पाहत होती. कारण तिला आशा होती की तो आद्याची काही तरी मदत करेल. ती वोर्डमध्ये काम करत होती. तिने विरेनला खुणावून पाच मिनिटं थांब असं सांगितलं आणि ती तिच्या कलीगला सांगून विरेनबरोबर कॅन्टीनमध्ये गेली.


गीता,“ तुमच्या बॉसच्या ट्रस्टकडून आद्याला काही मदत मिळू शकेल का?”


विरेन,“ खरं हो आणि नाही देखील.”


गीता,“ म्हणजे? नीट काय ते सांगा?”


विरेन,“आमची ट्रस्ट पिढीत मुलींना मदत करते त्यांच्या नातेवाईकांना नाही.”


गीता,“ मग हो का म्हणालात.”


विरेन,“ माझ्याकडे एक खूप चांगली डिल आहे पण तुम्ही शांतपणे ऐकून घेणार असाल तर सांगेन.”


गीता,“डिल? कसली डिल?”


विरेन,“ रुद्र म्हणजे रुद्राक्ष पोतदार! विनीत पोतदारांचा एकुलता एक मुलगा त्याची  आजी रत्नमालाबाई रुद्रच्या मागे बरेच दिवस झालं लग्न कर म्हणून लागल्या आहेत. त्यांना नात सुनेचे मुख पहायचं आहे पण रुद्रला लग्न नाही करायचं इतक्यात म्हणून मग आता रत्नमालाबाईंनी  एक विल तयार केली आहे. ज्यानुसार  सहा महिन्यात रुद्रने लग्न नाही केले तर तो इस्टेटीतून बेदखल होणार. त्याच्या वाटणीची करोडो रुपयांची इस्टेट रत्नमालाबाई पोतदार ट्रस्टला जाणार. रुद्रला एका वर्षासाठी काँट्रॅक्ट मॅरेज करायचे आहे. त्यासाठी तो जी मुलगी त्याच्याशी काँट्रॅक्ट मॅरेज करेल तिला एक कोटी रुपये द्यायला तयार आहे पण त्याला मुलगीच पसंत पडत नाही. त्याला त्याच्या आजीच्या नजरेत भरणारी सुंदर- सुशील आणि संस्कारी मुलगी हवी आहे एक वर्षासाठी बायको म्हणून, तो सत्तर लाख ऍडव्हान्स देणार आणि बाकी तीस लाख एक वर्ष पूर्ण झाल्यावर पण ऑल रेडी चार महिने होत आले आहेत.पण त्याला हवी तशी मुलगी मिळत नाही. अनेक मुली पैशासाठी त्याच्याकडे येतात पण त्याला अजून मुलगी पसंत पडली नाही. आता आजीच्या विल नुसार दोनच  महिने राहिले आहेत. जर तुमची मैत्रीण तयार असेल तर तो तिचा इंटरव्ह्यूव घेईल आणि त्याला पसंत पडली ती तर तो तिच्याशी काँट्रॅक्ट मॅरेज करेल. एक वर्षांसाठी.”तो सांगत होता


गीता,“ एक करोड रुपये बायकोचे नाटक करण्यासाठी? असं असेल तर आद्याचे खूप सारे प्रोब्लेम्स सॉल्व्ह होतील. पण ती तयार होईल का ते सांगता येणार नाही कारण तिच्या मनात पुरुषां विषयी आणि लग्ना विषयी तिरस्कार निर्माण झाला आहे.”ती गांभीर्याने म्हणाली.


विरेन,“ हे काही खरं लग्न नाही नाटक आहे आणि रुद्र तिला हात देखील लावणार नाही जगाच्यासमोर ते नवरा बायको असतील फक्त प्रत्यक्षात नाही. तुमच्या मैत्रिणीकडे खूप चांगली संधी आहे. तिला रुद्रने सिलेक्ट केले तर तिच्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होतील.” तो म्हणाला.


गीता,“ मी सांगते तिला बघू काय म्हणते ती! तुमचा मोबाईल नंबर मला देऊन ठेवा मी तिचे उत्तर तुम्हाला सांगेन फोन करून. ” ती म्हणाली आणि विरेनने तिला त्याचा मोबाईल नंबर दिला.


       गीता  तिथून सरळ लेडीचच्या जनरल वॉर्डमध्ये गेली तिथे आद्या नुकतीच तिच्या आई जवळ येऊन बसली होती. तिने पंधरा दिवसांची सुट्टी घेतली होती कारण गेल्या काही दिवसात तिच्या आईची तब्बेत खूपच खालावली होती आणि तिचा लहान  भाऊ रुपेश इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होता. त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून आणि आईला हॉस्पिटलमध्ये एडमीट केले म्हणून ती सतत आईजवळच असायची. गीता तिथे आली. आद्याची आई जागीच होती. 


गीता,“ कशा आहात काकू? ”


आद्याची आई,“ मी बरी आहे या आद्याला घरी चल म्हणलं किती दिवस इथं राहायचं तर ऐकत नाही. मी आता ठीक आहे ना. सांग हिला जरा”


गीता,“ काकू घरी जायची इतकी काय घाई आहे आराम करा तुम्ही. आद्या माझ्याबरोबर चलतेस का?” ती तिला खुणावत म्हणाली.


आद्या,“ हो! आई मी आलेच तू आराम कर. चल गं गीता.” ती म्हणाली.


           दोघी ही हॉस्पिटलमधून बाहेर आल्या


आद्या रुद्राक्षची ऑफर स्वीकारेल का? पुढे काय घडणार होते?

©स्वामिनी चौगुले









Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post