विरेनला आद्याबद्दलची सगळी माहिती मिळाली होती आणि रुद्राक्षने ज्या मुलीवर बलात्कार केला होता ही तीच मुलगी आहे याची खात्री देखील पटली होती. एकूणच रुद्राक्षने नुसत्या आवाजावरून आद्याला अचूक ओळखले होते. पण पुढे रुद्राक्ष भावनेच्या भरात काही चुकीचं पाऊल उचनार नाही ना याची विरेनला कुठेतरी मनोमन भीती वाटत होती आणि तसं झालं तर रुद्राक्षला खूप मोठी किंमत चुकवावी लागू शकते याची त्याला आद्याचा अवतार पाहून पुरेपूर कल्पना आली होती. त्यामुळे तो टेन्शनमध्ये ऑफिसच्या दिशेने निघाला होता.
इकडे ऑफिसमध्ये रुद्राक्षचे मात्र कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते. तो अधिरपणे विरेनची वाट पाहत होता. त्याने चार वेळा रिसेप्शनला फोन करून विरेन आला का? म्हणून फोन केला होता. रिसेप्शनिस्टने विरेनला पाहिले आणि ती विरेनला म्हणाली.
रिसेप्शनिस्ट,“ रुद्रसर तुमची खूप वेळ झालं वाट पाहत आहेत विरेनसर लवकर जा.”
विरेन,“ हो जातो मी दोन कॉफी पाठवून दे केबिनमध्ये आणि कोणाला ही आत सोडायच नाही. रुद्रच्या सेक्रेटरीला ही सांग अगदी अपॉइंटमेंट असली तरी. कळलं तुला?” तो म्हणाला आणि रिसेप्शनिस्टने मान डोलावली. विरेन केबिनमध्ये गेला आणि रुद्राक्षने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.
रुद्राक्ष,“ आद्या तीच मुलगी आहे ना वीर? ती नर्स काय म्हणाली? तू सगळी माहिती काढली आहेस ना?” तो अधिरपणे प्रश्नांवर प्रश्न विचारत होता.
विरेन,“ रुद्र काम डाऊन. जरा श्वास घे मी सांगतो सगळं. हो तुझा अंदाज खरा ठरला आहे ज्या मुलीवर तुझ्याकडून चुकून बलात्कार झाला ती मुलगी आद्याच आहे. तिचं होती त्या रात्री त्या पडक्या गेस्ट हाऊसमध्ये. ती नर्स गीता आहे ना ती तिची बालमैत्रीण आहे. तिच्याकडून कळले की त्या रात्री ती तू उठलास तर पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करशील या भीतीने रात्रीच्या अंधारात हायवे दोन किलोमीटर चालत गेली आणि तिथेच बेशुद्ध पडली. सकाळी या त्यांच्या मैत्र मैत्रिणींना ती सापडली आणि ते बेशुद्धावस्थेतच तिला मुंबईला घेऊन आले. आपण गेलो त्याच हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट झाली.”
रुद्राक्ष,“ पण तिचे मेडिकल चेकअप केल्यावर कळलेच असेल ना कि तिच्यावर रेप झाला आहे मग पोलीस कॅप्लेट कशी केली नाही तिथल्या डॉक्टरांनी किंवा शुद्धीवर आल्यावर तिने?”
विरेन,“ डॉक्टर पोलीस बोलावणार होते पण त्या नर्स गीताने रिसवेस्ट केली की आद्या शुद्धीवर आल्यावर काय ते ठरवेल आणि ही गोष्ट कोणाला ही कळू देऊ नका. ती हॉस्पिटल स्टाफ आहे म्हणून डॉक्टरांनी तिचे ऐकलं. आद्या शुद्धीवर आली तेंव्हा बिथरली होती. गीताने तिला सांभाळलं. पण आद्याने तुझा चेहरा कुठं पाहिला होता? मग कंप्लेन्ट कोणाच्या नावावर करणार होती ती? तिला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही मग काय करणार होती बिचारी अज्ञात व्यक्तीवर कंप्लेन्ट करून? त्यात तिच्या आईला हार्ट प्रॉब्लेम आहे.आपल्या मुलीवर बलात्कार झाला हे ऐकून त्यांना काही झाले असते तर? अरे लोवर मिडलक्लास लोकं आहेत ही. मुलगी चांगली वागत नाही अशी साधी आवई उठली तरी मुलींची लग्न होत नाहीत मग हिच्यावर तर रेप झाला होता. तिचा बॉयफ्रेंड ही होता म्हणे लग्न करणार होते दोघे गीताच मत होतं की आद्याने त्याला काही न सांगता त्याच्याशी लग्न करावं पण तिने तसं केलं नाही त्याला सगळं सांगितलं आणि त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. गेला तिचा बॉयफ्रेंड सोडून.”
रुद्राक्ष,“ कसले लोक असतात रे? आद्यावर मी बलात्कार केला यात तिचा काही दोष नव्हता तरी तिला तिचा बॉयफ्रेंड सोडून गेला. आपल्या सोसायटीमध्ये मुली खुल्लमखुल्ला स्वतःच्या मर्जीने कोणाबरोबर ही जातात. तरी सगळं माहीत असून ही मुलं लग्न आणि संसार करतात ना त्यांच्याशी! आत्ता ती हॉस्पिटलमध्ये काय करत होती? ती जॉब करते का?आणि कुठे? आणि घरी कोण कोण असते तिच्या?”
विरेन,“ तू ज्या सोसायटीबद्दल बोलत आहेस ती हाय सोसायटी आहे. ज्यात तरुण मुला- मुलींनी हे सगळं करणं अगदी नॉर्मल आहे कारण अमाप पैसा! त्यामुळे काही वाटत नाही अशा गोष्टींचे लोकांना पण आद्याचा समाज वेगळा आहे. ज्या समाजात इज्जत वगैरे खूप मॅटर करते. हे मी सांगायला हवं का तुला? तू काकूंबरोबर समाजसेवा करतोस तेंव्हा समाजाच्या भीतीने सख्ख्या आई - वडिलांनी अत्याचार झालेल्या मुलींना घरा बाहेर काढलेल्या मुली पाहिल्या आहेस ना तू? आणि त्या हॉस्पिटलमध्ये आद्याची आई एडमिट आहे. त्यांना हार्ट ब्लॉकेजेस आहेत. ओपन हार्ट सर्जरी सांगितली आहे पण चॅरिटेबल हॉस्पिटल असून ही पाच लाख खर्च येणार आहे म्हणे त्यासाठी आद्या वणवण करत आहे. वडील तर लहानपणीच गेले तिचे लहान भाऊ आहे तिला जो इंजिनिअरिंग करतो. आई नर्स होती त्यांनी सांभाळले मुलांना पण त्यांना काही वर्षांपूर्वी हार्ट प्रॉब्लेम झाल्यामुळे सगळी कुटूंबाची सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. एका खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करते.” त्याने आद्याची सगळी माहिती त्याला दिली.
रुद्राक्ष,“ ठीक आहे तू नजर ठेव तिच्यावर. मला दोन दिवस हवे आहेत विचार करायला.” तो गंभीरपणे म्हणाला.
विरेन,“ तू नेमकं काय करणार आहेस रुद्र?”
रुद्राक्ष,“ दोन दिवसांनी सांगेन. आत्ता तुला जेवढं सांगितलं तेव्हढं कर.” तो म्हणाला.
विरेन,“ ठीक आहे. मी आपली माणसं कामाला लावतो. जातो मी.” तो म्हणाला आणि निघून गेला.
रुद्राक्ष मात्र विचार मग्न झाला. आद्याचा अवतार पाहून त्याच्या लक्षात आलं होतं की ती त्याला माफ तर करणार नाही पण तिला सत्य सांगून तिची माफी मागण्याआधी रुद्राक्षला तिला मदत करायची होती. सत्य कळलं तर ती कधीच त्याच्याकडून मदत घेणार नाही हे त्याला माहित होतं. पण मदत ही अशा पध्दतीने करायची होती त्यामुळे तिच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचणार नाही. रुद्राक्षला तिच्या साहित तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यायची होती पण कशी त्याला कळत नव्हतं. या विवंचनेत त्याचे मन कामात लागत नव्हतं म्हणून तो लवकरच घरी निघून आला.
तो घरी आला आणि त्याच्या रूममध्ये गेला. फ्रेश होऊन तो विचार करत होता पण त्याला काहीच सुचत नव्हतं. अशा वेळी त्याला त्याच्या आजीची म्हणजे रत्नमालाबाईंची आठवण यायची. तो त्यांना सल्ला विचारायचा. आज ही तो उठला आणि रत्नमालाबाईंची रूममध्ये गेला. रत्नमालाबाई भागवत गीता वाचत होत्या
रत्नमालाबाई,“ या या छोटू सरकार. बऱ्याच दिवसांनी आज आजीच्या रूममध्ये?” त्या भागवत गीता बाजूला ठेवून म्हणाल्या
रुद्राक्ष,“ काय गं आजी मी येत नाही तुला भेटायला.” तो जाऊन त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला.
रत्नमालाबाई,“ येतो ना पण काही तरी सल्ला हवा असल्यावर बोल छोटू काय झालं?” त्या त्याच्या केसातून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या.
रुद्राक्ष,“यु नो मी व्हेरी वेल. आजी एक प्रश्न पडला आहे मला. समज आपल्याकडून एखाद्याच्या बाबतीत चुकून गुन्हा घडला आणि बाप्पाने त्याच व्यक्तीला पुन्हा आपल्या पुढे आणून उभं केलं. रादर असं समज की आपल्याला प्रायश्चित्त करण्याची संधी दिली तर आपण काय करायला हवं? आणि आपन प्रायश्चित्त घेऊन ही त्या व्यक्तीने आपल्याला माफ नाही केलं तर?”
रत्नमालाबाई,“ चूक आणि गुन्हा यात फरक असतो छोटू. गुन्हा चुकून झाला तरी तो गुन्हाच असतो आणि त्याची शिक्षा ठरलेली असते. कर्म केलं तर या ना त्या रुपात त्याच फळ तर आपल्याला भोगावेच लागणार ना! बच्चा श्रीमत भगवत गीतेत एक श्लोक आहे.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोsस्त्वकर्मणि।
अर्थात माणसाने कर्म करत राहावं. फळाची इच्छा करू नये. हा पण याचा अर्थ असा होत नाही की माणसाला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळं मिळणार नाहीत. माणसाचा जन्म-मृत्यू पुर्नजन्म सगळं तर त्याच्या कर्मावर अवलंबून असतं बच्चा. म्हणून माणसाने नेहमी चांगली कर्म करावीत.जर कोणाच्या हातून अपराध झालाच तर त्याने तो गुन्हा कबूल करून त्याची माफी मागावी. जास्तीत जास्त काय होईल आपल्याला शिक्षा मिळेल किंवा माफी.समजलं का?”
रुद्राक्ष,“ हो आजी समजलं. पण समोरची व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असेल आणि आपण आपला गुन्हा कबूल केल्यावर ती आपली मदत घेणार नसेल तर?” त्याने पुन्हा त्याला पडलेला प्रश्न विचारला.
रत्नमालाबाई,“ मग आधी त्या व्यक्तीची अडचण दूर करायची हा पण त्याच्या बदल्यात तो माफ करेल ही अपेक्षा नाही ठेवायची. निरपेक्ष मदत करायची आणि मग त्या व्यक्तीची माफी मागायची. इट्स सो सिंपल! पण आज इतके गहन प्रश्न का विचारले जात आहेत छोटी सरकार?” त्यांनी त्याचा गालगुच्चा घेत हसून विचारले.
रुद्राक्ष,“ काही नाही गं आजी असंच प्रश्न पडले म्हणून विचारलं. यु आर सच माय स्वीट हार्ट!” तो हसून म्हणाला.
रत्नमालाबाई,“ अँड यु आर सच डार्लिंग छोटू सरकार.”
रुद्राक्ष थोडावेळ त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसला आणि निघून गेला. रत्नमालाबाईंशी बोलून त्याला त्याच्या प्रश्नांची तर उत्तरं मिळाली होती आणि त्याला त्याचा मार्ग ही सापडला होता. रात्री झोपताना रुद्राक्षने त्याच्या कपड्यांच्या मागे अगदी आत लपवून ठेवलेली एक छोटी पेटी काढली. त्यात आद्याचे अर्धवट तुटकेले कर्णफुल, झुमका आणि तिच्या ओढणीचा तुकडा होता. ते पाहून तो म्हणाला.
“ आद्या आपण आधी भेटलो ती परिस्थिती आणि वेळ दोन्ही चांगली नव्हती. अर्थात मी असं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकणार नाही आणि आजी म्हणाली तसं तुझ्याकडून माफीची अपेक्षा ही नाही करणार पण तुझी पुढची लाईफ सुखकर करून मग मी माझ्या गुन्ह्याची कबुली देईल. माझ्या तुझ्या आयुष्यात एक रात्र येण्याने जे वादळ निर्माण झाले ते वादळ मीच शमवेन. मी प्रॉमिस करतो तुला! यावेळी मी तुझ्या आयुष्यात वादळ बनून नाही तर सुखाची झुळूक बनून येईन!”
रुद्राक्ष नेमकं काय करणार होता? आणि त्याच्या आद्याच्या आयुष्यात येण्याने आद्याचे आयुष्य काय नवीन वळण घेणार होते?
पाहू या पुढच्या भागात..
©स्वामिनी चौगुले
