अपूर्व संध्याकाळी घरी दहा वाजता आला. शामराव त्याचीच वाट पाहत होते. त्याने त्यांना हॉलमध्ये बसलेलं पाहिलं.
अपूर्व,“ किती वेळा सांगितलं डॅड तुला की तू माझी वाट पाहत जाऊ नकोस.”
शामराव,“ तुझ्या सांगण्यावरून मी जेवण करून बसतो ना अप्पू.पण तू आल्या शिवाय मला झोप लागत नाही बच्चा. आणि चल जेवायला आणि ही हातात कसली पिशवी आहे?” त्यांनी विचारलं.
अपूर्व,“ मी आज जेवण करून आलो आहे एका क्लायंट बरोबर! आणि यात पेस्ट्रीज आणि रसमलाई आहे. तुला देऊ का?” त्याने विचारलं.
शामराव,“ नको मला. फ्रीजमध्ये ठेवून दे. मी झोपायला जातो.तू ही झोप आता.” ते म्हणाले आणि निघून गेले.
अपूर्व फ्रेश झाला आणि तो जिना चढून वर गेला. शामरावांनी बंगल्याचा वरचा मजला अपूर्व दहा वर्षांचा झाला तेंव्हा बांधायला काढला होता. वर चार पाच रूम होत्या. खालीच प्रशस्त जागा असल्याने आणि घरात जास्त लोक नसल्याने त्यांनी वरचा मजला भाड्याने देता येईल अशा विचाराने बांधला होता. आणि तोच विचार करून त्यांनी आतून एक जिना आणि बाहेरून एक जिना काढला होता. पण त्यांनी कधीच वरचा मजला भाड्याने दिला नाही. त्यातली एक रूम अपूर्वची स्टडी रूम केली होती. अपूर्वने आजपर्यंत तिथेच अभ्यास केला होता. अपूर्व आणि किमया शाळेत असताना किमया दुपारच्या वेळी त्याच्याबरोबर अभ्यासाला यायची. दहावीत असताना अपूर्वने तिची खूप मदत केली होती. ती बाहेरच्याच जिन्याने वर जायची आणि तिचे सगळे बालपन अपूर्वबरोबर त्या बंगल्यात खेळण्या- बागडण्यात गेले होते. त्यामुळे तिला बंगल्याचा सगळा परिसर माहीत होता. अपूर्व खोलीत जाऊन तिचीच वाट पाहत होता. तोपर्यंत किमया गेटात असलेल्या छोट्या दारातून बंगल्यात शिरली. तिला वॉचमनने आत घेतले. अपूर्वने आधीच त्याला सांगून ठेवले होते की आज किमया येणार आहे. त्यामुळे किमया बिनबोंबाट मागच्या जिन्याने अपूर्वच्या रूममध्ये पोहोचली. अपूर्वने दार उघडले.
अपूर्व,“ मला वाटलं होतं मॅडम माझ्या आधी येतील पण नाही.”
किमया,“ हो ना इतकं सोप्प आहे का ते? आईला चुकवून स्कुटी घेऊन बाहेर पडणे.”
अपूर्व,“ राहू दे खूप जोखीम पत्करून आलीस ना? हे घे गोड खा पेस्ट्रीज आणि तुझी आवडती रसमलाई.” तो रसमलाईचा मोठा बाऊल आणि पेस्ट्रीजची डिश तिच्यासमोर ठेवत म्हणाला.
किमया,“ थँक्स!” ती हसून म्हणाली आणि तिने खायला सुरुवात केली.
अपूर्व,“ तू पण खा म्हणायची पद्धत आहे की नाही? हावरट कुठली!” तो तोंड वाकडं करत म्हणाला.
किमया,“ ये हावरट कोणाला म्हणतो रे? आणि तुला खा म्हणायची गरज काय? तुझं तू घ्यायचं ना!” ती म्हणाली.
अपूर्व,“ घ्या कितीही गोड खायला घाला कारलं कडूच राहणार.”
किमया,“ तू मला कारलं म्हणालास? पण लक्षात ठेव कारलं कडू असले तरी ते औषधी असते.आणि मला का बोलावलेस बोल लवकर. मला घरी जायचं आहे.” ती रसमालाई त्याला भरवत म्हणाली.
अपूर्व,“ तू लगेच जाणार आणि मी तुला जाऊ देणार का? तुला काय नुसतं खायला बोलावलं नाही मी.” तो तिलाजवळ ओढत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आणि किमयाने त्याच्या डोळ्यातील भाव ओळखले.
किमया,“ अपूर्व एकदा झालं म्हणून सारखं सारखं तुला हवं ते मिळणार नाही आ. एक महिना दहा दिवसांत आपलं लग्न होईल मग तुला कोणी अडवणार नाही.”
अपूर्व,“ एक महिना दहा दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवस होतात मॅडम आणि तुम्ही सगळं केलेलं चालतं.मीच काही केलेलं चालत नाही. सकाळी ऑफिसमध्ये कोण आले होते? तोंड गोड करायला? जा तू.” तो तोंड फुगवून बोलत होता.
किमया,“ म्हणजे आज साहेबांना ऐकायचं नाही तर?(तिने त्याला पाहत विचारलं. आणि त्याने लहान मुलासारखी नकारार्थी मान हलवली.) ठीक आहे पण मी रात्रभर इथं नाही थांबणार दोन तीन तासांनी मी जाणार आणि मला सोडवायला तू यायचं कारण इतक्या रात्री मी एकटी जाऊ शकत नाही.” ती हसून म्हणाली.
आणि अपूर्वने तिला बेडवर ओढले. जवळजवळ दोन तास दोघे एकमेकांमध्ये विरघळत राहिले. शेवटी अपूर्व तिच्या मिठीत विसावला.
किमया,“ आता खुश?” तिने त्याच्या केसातून हात फिरवत विचारलं.
अपूर्व,“ हुंम! पण तू अजून थांब ना.” तो लाडात येत म्हणाला.
किमया,“ तुला माहीत आहे ते शक्य नाही. आपलं लग्न ठरलं आहे अजून झाले नाही. हे जे काही आपले सुरू आहे ते चोरून सुरू आहे. बरं सोड आता मला कपडे घालू दे. आणि चल बरं.” ती त्याला समजावत म्हणाली.
अपूर्व,“ पण असं चोरून भेटण्यात आणि चोरून असं काही करण्यात वेगळीच मजा आहे किमया. यु आर सच अ ब्युटीफुल गर्ल! तुला खरं तर इतक्यात सोडू वाटत नाही पण ठीक आहे मग पुन्हा कधी भेटणार आहेस ते सांग आधी?” तो तिला आणखी जवळ ओढून कुरवाळत म्हणाला.
किमया,“ मी फोन करून सांगते ना पण साखरपुड्याच्या खरेदीसाठी वेळ काढा साहेब.” ती म्हणाली.
अपूर्व,“ हो काढतो गं! आता तू काय करतेस किमया? म्हणजे दिवसभर घरात करमते का? तू तुझं समाजसेवेचं काम नको सोडूस खूप चांगलं काम करतेस तू. वाटल्यास मी बोलू का काकांशी?” त्याने विचारलं.
किमया,“ थँक्स म्हणजे मला कोणी तरी सपोर्ट करणारं आहे तर! आणि काही नाही रे सध्या टाईमपास सुरू आहे. आणि मी तीन महिन्यांची सुट्टी काढली आहे. आपले लग्न झाल्यावर मग जॉईन करेन ट्रस्ट. आणि नको बोलुस काही बाबांना ते माझ्यावरच भडकतील.” ती उठून स्वतःचे आवरत बोलत होती.
अपूर्व,“ मग मी कायमच तुला सपोर्ट करत आलो आहे तुलाच ते कळत नव्हते. बरं तुला काय करायचं ते कर.”
किमया,“ यु आर सच अ डार्लिंग. लव यु.” ती डोळे मिचकावत म्हणाली.
अपूर्व,“ एस आय एम. बट आय हेट यु स्वीटी.” तो हसून तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला.
किमया,“ चला आता पुरे झाले. बारा वाजून गेले आहेत.” ती त्याला ढकलत म्हणाली.
अपूर्व,“ हो चल.”
तो म्हणाला आणि मागच्या जिन्याने दोघे बाहेर पडले वॉचमनने हळूच गेट उघडले. किमयाने तिची स्कुटी बाहेर लावली होती.
किमया,“ आरे पण आपण स्कुटीवर दोघे गेलो तर मग तू परत कसा येणार?” तिने विचारलं.
अपूर्व,“ मी तुझ्यासारखा बुध्दू आहे का? आत्ता याचा विचार करायला. मी आधीच विचार करून ठेवला होता. ती बघ मी रेंटवर एक कार दिड महिन्यांसाठी घेऊन ठेवली आहे. तू स्कुटीवर जा मी तुझ्या पाठोपाठ आहे बॉडीगार्ड बनून घरापर्यंत.” तो तिला बंगल्या बाहेर पार्क केलेल्या गाडीची चावी दाखवत म्हणाला.
किमया,“ खूप हुशार रे तू!” ती त्याचा गाल ओढत म्हणाली.
अपूर्व आणि किमयाचे असं चोरून भेटणे सुरूच राहिले. बऱ्याच वेळा त्यांच्या गप्पा रंगत तर कधी रात्री. आज साखरपुड्याचा दिवस उजाडला. शामरावांनी एका फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये साखरपुडा ठेवला होता. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या.संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला. सम्यक मात्र टेन्शनमध्ये दिसत होता. अपूर्व आणि किमया पाहुण्यांना भेटण्यात गर्क होते. सम्यकने अपूर्वला डोळ्यांनी बाजूला ये म्हणून खुणावले आणि अपूर्व त्याच्याबरोबर गेला.
अपूर्व,“ काय झाले भाई तू इतका टेन्शनमध्ये का आहेस?” त्याने विचारलं.
सम्यक,“ आत्ताच जेलमधून फोन आला आहे अप्पू. तो आमदार पाटलाचा मुलगा त्याला आणि त्याच्या मित्रांना तुझ्यामुळे खरं तर तुझ्यापेक्षा जास्त किट्टूच्या आनंदोलनामुळे अटक झाली होती ना त्यानी थोड्यावेळा पूर्वी आत्महत्या केली आहे. तो त्या पाटलाच एकुलता एक मुलगा होता. मला भीती आहे की तो पाटील आता गप्प बसणार नाही अप्पू मला किमयाची काळजी वाटतेय. तिला ही बातमी कळायला हवी.” तो काळजीने बोलत होता.
अपूर्व,“ खरं तर असं घडायला नको होतं भाई पण यात किमयाचा काहीच दोष नाही. आणि तू तिची काळजी नको करुस आपण तिच्यासाठी बॉडीगार्ड ठेवू आणि मी सांगतो तिला ही बातमी. पण फंक्शन झाल्यावर.” तो त्याला अश्वस्थ करत म्हणाला.
आणि दोघे पुन्हा सगळ्यात मिसळले. फंक्शन संपले किमया खूप खुश होती.
अपूर्व,“ अम्मू मी किमयाला लॉंग ड्राइव्हला घेऊन जाऊ का?” त्याने विचारलं.
सुधा,“ आता काय अर्धे लग्नच झालं की आता परवानगी मागायची नाटकं कशाला? आणि मी नाही म्हणाले तर ही जणू तुझ्याबरोबर जाणारच नाही जसं काही.” त्या हसून म्हणाल्या.
जयेशराव,“ जा तुम्ही दोघे पण खूप उशीर करू नका. किमयाला आणून सोड वेळवर घरी.” ते म्हणाले आणि अपूर्व हो म्हणाला.
अपूर्व तिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याने खरं तर तिथे आधीच स्वीट बुक करून ठेवले होते. दोघे स्वीटमध्ये गेले तर तिथे पूर्ण रूम फुलांनी सजवली होती. लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी बेडवर मोठ्या अक्षरात आय लव यु किमया लिहले होते. टेबलवर आईस बकेटमध्ये बिअर वगैरे होती. किमया सगळं पाहून खुश झाली पण अपूर्व टेन्शनमध्ये आहे तिला गाडीतून येतानाच त्याचा चेहरा पाहून कळले होते.
किमया,“ मला खूप आवडलं अपूर्व हे पण तू टेन्शनमध्ये का आहेस?”
अपूर्व,“ तू इथं बस आणि मी काय सांगतो ते शांतपणे ऐक किमया.” तो तिला बेडवर बसवत म्हणाला.
किमया,“ काय झालं अपूर्व?”
अपूर्व,“ किमया तू त्या पाटलाच्या मुलाला आणि त्याच्या साथीदारांना बलात्काराच्या केसमध्ये अटक व्हावी म्हणून आंदोलन केलंस आणि पाटलाने सुपारी देऊन तुला जीवे मारण्याचा प्रयत्न केला मी त्यावेळीमध्ये पडलो आणि मला गोळी लागल्यामुळे प्रकरण आणखीन चिघळले आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. आपल्या दोघामुळे रादर मोस्टली तुझ्यामुळे गुन्हेगारांना अटक झाली पण किमया आज पाटलाच्या मुलाने जेलमध्ये आत्महत्या केली आहे.” तो शांतपणे तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून बोलत होता आणि किमया रडायला लागली.
किमया,“अपूर्व माझ्यामुळे कोणाचा तरी जीव जावा असं मला कधीच वाटलं नाही. मी फक्त गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न केला.” ती रडत बोलत होती आणि अपूर्वने तिला मिठी मारली.
अपूर्व,“ आय नो दॅट स्वीटी! मी तुला ही बातमी सांगितली कारण उद्या तुला टी. व्ही आणि न्यूज पेपरमधून हे कळलंच असतं. पण आता आपल्याला सावध राहायला हवं कारण तो पाटील तुला इजा पोहचवण्यासाठी काहीही करू शकतो. मी उद्याच तुझ्यासाठी बॉडीगार्ड अपॉइंट करतो.” तो तिला समजावत होता.
किमया,“ हुंम मी घेईन माझी काळजी.” ती डोळे पुसत म्हणाली.
अपूर्व,“ पण आज कोणी तरी पहिल्यांदा लेहगा-चोलीत आणि आता साडीत खूप कातील दिसतंय बाबा. आज माझा मर्डर होणार नक्की.” तो तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाला.
किमया,“ हो पण काय उपयोग लाईम लाईट तर नुसतं गालात हसून कोणी तरी घेऊन गेलं ना.आणि हे कोणी लिहलं आहे आय लव यु किमया म्हणून कारण कोणी तरी मला सतत आय हेट यु म्हणत असते ना?” तिने तोंड फुगवून बेडवर लिहलेल्या अक्षरांकडे बोट दाखवत विचारलं. अपूर्व तोपर्यंत बिअरची बाटली फोडून दोन ग्लास बिअर घेऊन एक ग्लास किमयाच्या हातात देत म्हणाला.
अपूर्व,“ हे मी नाही लिहायला लावलं बरं का! मी तर आय हेट यु किमया असं लिहायला सांगितलं होतं. पण या हॉटेलवाल्यानी मनाने कारभार केला.” तो बिअर पीत हसून म्हणाला.
किमया,“ हो का? मग इतकंच हेट करतो मला तर आज एंगेजमेंट का केलीस माझ्याशी?” तिने नाटकीपणे विचारलं.
अपूर्व,“ तुझा बदला घ्यायचा आहे ना.” तोही नाटकीपणे म्हणाला आणि तिच्या हातातून ग्लास काढून घेत. दोन्ही ग्लास कॉर्नर पिसवर ठेवून तिला बेडवर आडवे करत म्हणाला.
किमया,“ असा घेणार बदला तू?” तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं.
अपूर्व,“ हो असाच घेणार आहे. आता तू ना जरा गप्प बस एक तर काकांनी मला तुला लवकर घरी सोडायला सांगितलं आहे. मला अजून वेळ वाया घालवायचा नाही एक तर या ग्रीन साडीत तुला पहिल्यांदा पाहून मी स्वतःला कसं कंट्रोल केलं आहे ते मला माहित.” तो तिच्या मानेत चेहरा खुपसून बोलत होता आणि किमया नुसती हसली.
आता कथेत आणखीन एक ट्विस्ट आला होता कारण आमदार पाटलाच्या पोराने जेलमध्ये आत्महत्या केली होती. पाटील किमयाला पुन्हा मारण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना?
पुढे काय घडणार आहे?
वाचूया पुढच्या भागात!
क्रमशः
©swamini chougule
