दुसऱ्या दिवशी सकाळीच विरेन रुद्राक्षला भेटायला आला होता. आद्याने त्याला पाहिलं आणि तोंड वाकडं केलं.
आद्या,“ सकाळ सकाळ कशाला आलास रे रावणा तोंड दाखवायला?”
विरेन,“माझ्या बहिणीची खूप आठवण येत होती म्हणून आलो. कॉफी घेऊन ये मला आणि रुद्रला नाश्ता वगैरे दिलास का? नाय म्हंजी पंधरा दिवस रजा याला बरं नाही म्हणून घेतलीस ना तू म्हणून विचारलं.” तो हसून म्हणाला.
आद्या,“रुद्र या रावणाला सांगा नाही तर असं तोंड फोडेन याचं की स्वतःला आरशात ओळखता येणार नाही याला.” ती चिडून म्हणाली.
रुद्राक्ष,“ तुम्ही दोघे दया करा माझ्यावर एक तर खूप डोकं दुखतंय माझं.” तो वैतागून म्हणाला.
आद्या,“डोकं दुखायला असायला हवं ना ते आधी. निर्लज्ज रावण कधी ही उठसूट येतो इथं. नर्स तुम्ही माझ्या बरोबर चला नाश्ता करा. हा फुकटा आहे इथं तो काळजी घेईल रुद्रची.” ती तोंड वाकडं करून म्हणाली आणि नर्स हो म्हणून निघून गेली.
विरेन,“ जाती का आता आणि फुकटा कोणाला म्हणतेस गं? कॉफी पाठवा तेवढी शूर्पणखा ताईसाहेब” तो हसून मोठ्याने ओरडला. आणि जाता जाता आद्याने चिडून सोप्यावरचा तक्क्या त्याला फेकून मारला.
रुद्राक्ष,“ का बाबा आगीला हवा देतोस तू? ती भडकली ना तर तुझी खैर नाही. माझा तर पान उतारा केला सगळ्यांसमोर आणि माझ्या इज्जतीचा फालुदा.” तो तोंड फुगवून बोलत होता.
विरेन,“ मला आजीने सगळं सांगितलं आहे. तुला तसंच पाहिजे. गप्प जे देतील ते खायचं ना आपण माती खाल्ल्यावर!कशाला नखरे करायचे.” तो हसून म्हणाला.
रुद्राक्ष,“ हो बाबा तूच राहिला होता ज्ञानामृत पाजायचा. एक तर सलाईल लावून हात दुखायला लागला आहे अजून एक दिवस ही सलाईन सहन करावी लागणार आहे.” उजव्या हातात सलाईन लावलेला हात धरून तोंड बारीक करून बोलत होता.
विरेन,“ सहन तर करावेच लागेल रुद्र. तुझी अवस्था काय होती त्या दिवशी किती घाबरलो होतो आम्ही.” तो बोलत होता आणि आद्या कॉफी आणि थालीपीठ घेऊन आली.
आद्या,“ हे घे खा. माझी आई म्हणते की गरीब लोकांना दान करावे. पुण्य मिळते. आणि रुद्रना दिलंस तर याद राख. त्यांना सूप दिले होते. थोड्या वेळाने फ्रुट्स द्यायचे आहेत.” ती त्याच्या डोक्यात टपली मारून म्हणाली आणि निघून ही गेली.
विरेन,“ अरे ती मला गरीब म्हणून गेली! हिच्या तर ना.. कशाला लग्न केलंस रे तू हिच्याशी?” तो रागाने म्हणाला.
रुद्राक्ष,“ वरून धमकी पण देऊन गेली ती तुला! आहेस कुठं तू? की सकाळ सकाळ घेऊन आलास?” तो हसून म्हणाला.
विरेन,“ गप्प ये तू. तुला नाही माहीत ही तुझ्याबद्दल काय काय बोलते.” तो थालीपीठ खात म्हणाला.
रुद्राक्ष,“ काय बोलते माझ्याबद्दल?”त्याने उत्सुकतेने विचारलं.
विरेन,“ इतकं उत्साहाने विचारायची गरज नाही. वाईटच बोलली आहे ती. म्हणे तू हावरट आणि असमाधानी आहेत. इतका मोठा बिझनेस असताना कर्ज काढून कंपनी विकत घ्यायची आणि ते फेडण्यासाठी रात्रंदिवस काम करायची काय गरज आहे? तुझ्यामुळे तिच्या आईने तिला रागावले. आता दोन महिने तिला घरी येऊ देणार नाही. वरून सगळ्यांना दाखवायला तुझी सेवा पण करवी लागते. पण तू नवीन कंपनी खरेदी केलीस त्यात तिचा काय फायदा आहे म्हणे? मूर्ख कुठली तिच्याचसाठी तू कंपनी घेतलीस ना पण तिला कुठं माहीत आहे? इतकं सगळं वाईट बोलून म्हणे तुझ्याबद्दल आदर वाटतो मॅडम ना. का तर आज कालच्या मुलांना सगळं रेडिमेड हवं असतं पण तू वेगळा नमुना आहे म्हणे.(तो सांगत होता आणि रुद्राक्ष हसला.) इतकं खुश व्हायला काय झालं रे तुला? तिने आरती नाही केली तुझी. उलट तुला हावरट आणि असमाधानी म्हणाली.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.
रुद्राक्ष,“ हावरट आणि असमाधानी समजलेलं केंव्हा ही बरं नराधम समजण्यापेक्षा वीर. आणि आदर माझ्याबद्दल? ज्या दिवशी तिला कळेल की मी तोच नराधम आहे त्यादिवशी काय होईल? मी पात्र नाही तिच्या आदराच्या.” तो खिन्नपणे म्हणाला.
विरेन,“ असं काय बोलतोस रुद्र! अरे तू खूप काही केलं आहेस तिच्यासाठी आणि अजून करत आहेस. शिवाय तू तिला तुझी बायको असण्याचा सन्मान दिला आहेस ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आजकाल कोणी नाही करत इतकं. सगळे हात झटकायला बघतात मोठं मोठे गुन्हे करून.” तो त्याला समजावत होता.
रुद्राक्ष,“ मी किती ही काही ही केलं तरी मी तिचा गुन्हेगार आहे हे सत्य बदलणार नाही. मी किती ही केलं तरी तिच्या मनावर उमटलेले ओरखडे जाणार आहेत का? माझ्यामुळे ती तिच्या पहिल्या प्रेमाला मुकली हे सत्य बदलणार आहे का? मी तिला सन्मान देणारा कोण रे? मी तर तिच्या शरीरावर घाला घालून तिचा आत्मसन्माला माझ्या क्षणिक वासाने पोटी पायदळी चिरडले. राजकुमाराच्या स्वप्नात रमणारी एक निरागस मुलगी तिचा आज प्रेम आणि पुरुषांवरचा विश्वास उडाला आहे तो कसा परत करता येईल? एक हुशार आणि सामान्य मुलगी एग्रेसिव्ह होते तिच्या मनावर जो परिमाण झाला त्याच काय? मी किती ही प्रायश्चित्त घेतले तरी तिचा गुन्हेगारच राहणार आहे आणि पुढे जाऊन ती जी शिक्षा करेल ती मी भोगायला तयार आहे.” तो दुःखी होत बोलत होता.
विरेन,“ रुद्र तू खूप जास्त विचार करत आहेस.” तो म्हणाला तोपर्यंत नर्स तिथे आली आणि दोघे ही गप्प झाले.
★★★
आठ दिवस असेच निघून गेले. रुद्राक्ष आता आजारातून सावरला होता. आद्या अजून घरीच होती. संध्याकाळचे चार वाजले होती. रुद्राक्ष नुकताच झोपून उठला होता. आद्या काही तरी वाचत बसली होती आणि सविता रुद्राक्ष उठला का पाहायला तिथे आली.
सविता,“ उठलास जा फ्रेश हो. मी तुझ्यासाठी फ्रुट्स घेऊन येते.” ती त्याच्या जवळ बेडवर बसल म्हणाली आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला.
रुद्राक्ष,“ मॉम मला घरात बसून कंटाळा आला आहे. मी कुठे तरी फिरून येऊ का?” त्याने लाडात येत विचारलं.
सविता,“ रुद्र तुझा ताप आत्ता कुठे कमी झाला आहे आणि तुला फिरायला जायचं आहे? नाही आराम कर बेटा घरात.” ती त्याच्या केसातून हात फिरवत बोलत होती. आद्या खुर्चीवर बसून दोघा मायलेकाच चालेलं गुळपिठ शांतपणे ऐकत आणि पाहत होती.
रुद्राक्ष,“ प्लिज यार मॉम. मी कुठे लांब नाही जाणार इथंच फिरून येईन. इथल्या जवळच्या गार्डनमध्ये आणि ड्रायव्हर आणि गाडी घेऊन जाणार आहे ना प्लिज ना मी खूप बोअर झालो आहे.” तो उठून आर्जवी सुरात म्हणाला.
सविता,“ ठीक आहे. आद्या याच्याबरोबर जा. आणि रुद्र बाहेरच काही खायचं नाही. तुला डॉक्टरांनी डाएट फॉलो करायला सांगितलं आहे. आद्या याच्यावर लक्ष ठेव.”
आद्या,“ हो मॉम.” ती म्हणाली.
सविता,“ जा मग तयार हो. फ्रुट्स आणून देते ते खा आणि मग जा. तोपर्यंत आद्या पण चहा, नाश्ता करून तिचं आवरेल.चल आद्या.” त्या म्हणाल्या
रुद्राक्ष,“ हो.” तो खुश होत म्हणाला.
आद्या त्यांच्या पाठोपाठ गेली ती मनात विचार करत होती.
‛जरा म्हणून घरात बसवत नाही या माणसाला. लगेच बोअर झालं म्हणे. किती लाडात येतो हा पण कसला क्युट दिसतो लाडात आल्यावर, याचे ते चॉकलेटी डोळे नुसतं त्यात हरवून जायला होतं. हा असा क्युट थोबाड करून लाडात आला तर मॉमच काय पण जगातली कोणती ही मुलगी याच्यासाठी काही ही करेल.(तिच्याच विचाराने ती चमकली.) आद्या सावर स्वतःला. रुद्राक्ष तुझा खोटा नवरा आहे त्याच्यात अडकवून घेऊ नकोस स्वतःला. तुलाच त्रास होईल.’
ती या सगळ्या विचारत दंग होती आणि सविताने तिला हाक मारली.
रुद्राक्ष आणि आद्या संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर पडले. ते जवळच असलेल्या गार्डनमध्ये गेले. रुद्राक्ष एका बेंचवर बसून तिथेच फुरबॉल खेळणाऱ्या लहान मुलांना पाहत होता. त्याला त्या मुलांमध्ये खेळण्याचा मोह आवरला नाही. आणि तो उठून त्यांच्याकडं जाऊ लागला.
आद्या,“ कुठं निघालत तुम्ही? बसा इथं.”
रुद्राक्ष,“ त्यांच्याबरोबर खेळायला जातोय. आणि मॉमने तुला माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं म्हणजे माझ्या डोक्यावर बसायचं नाही आ.” तो तोंड फुगवून म्हणाला आणि निघून गेला. आणि आद्याने ही तोंड वाकडं केलं.
तो पाहता पाहता त्यांची ओळख काढून त्यांच्याच सामील झाला. तो त्यांच्याबरोबर लहान होऊन फुटबॉल खेळत होता. कधी हसत होता तर कधी कोणाला ओरडत होता. आणि त्याच हे रूप पाहण्यात आद्या दंग होती. तो मुलांबरोबर खेळत खेळत थोडा लांब गेला आणि आद्या उठून त्याला पाहतच चालत होती. तेवढ्यात एका तरुणाचा तिला धक्का लागला. खरं तर चूक तिचीच होती पण ती भडकली.
आद्या,“ डोळे फुटले का रे तुझे?” तिने रागाने विचारलं.
तरुण,“ सॉरी ताई पण चूक तुमचीच होती. तुमचं लक्ष नव्हतं चालताना.” तो तरी नम्रपणे बोलत होता.
आद्या,“ एक तर मुलगी पाहिली की मुद्दामहून धडकायचं आणि वरून मलाच म्हणतोस की चूक माझी होती.” ती रागाने त्याची कॉलर धरून बोलत होती.
तरुण,“ मी ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काही ही बोलणार आणि वरून कॉलर धरणार का? का प्रत्येक वेळी मुलंच मुद्दामहून धडकतात का? मुली ही धडकतात की हँडसम मुलगा पाहून.” तोही स्वतःची कॉलर सोडवून घेत रागाने म्हणाला. तोपर्यंत तिथं लोक गोळा झाले होते आणि आद्याचा आवाज ऐकून रुद्राक्ष तिथं आला.
आद्या,“ तुला काय वाटतं मी धडकले तुला? एकदा तोंड बघ आरशात स्वतःच. पुरुषाची जाताच मेली हलकट.” ती रागाने तणतणत होती.
तरुण,“ ओ ताई शिव्या द्यायचं काम नाही.” तो ही आता चिडला होता.
रुद्राक्ष,“ काय सुरू आहे आद्या तुझं? चल!” तो म्हणाला.
आद्या,“ हा बघ हा माझा नवरा आहे. याच्या समोर तू कुठे लागावास रे! हँडसम म्हणे. तुझा गैरसमज दूर कर. पाहिलेस ना किती चिकना आहे माझा नवरा. कुत्रा स्वतःच येऊन धडकला. ” ती रागाने बोलत होती.
रुद्राक्ष,“ आद्या बिहेव युवर सेल्फ.”
तरुण,“ मी इतका वेळ झालं बाई माणूस म्हणून ताई म्हणतोय तर तुम्ही शिव्या देताय. आहे ना तुमच्याकडे देखणा नवरा मग त्यालाच धडकायचं ना.” तो ही आता चांगलाच पेटला होता.
आद्या,“ मला काय सांगताय बिहेव म्हणून? ह्याला तर आता बघतेच.”
असं म्हणून ती त्याच्या अंगावर मारायला गेली. आता भरपूर लोकं जमली होती आणि आपापसात कुजबुजत होती. ती त्या तरुणाच्या अंगावर गेली आणि रुद्राक्षने तिला धरले. तिला उचलून एखादं पोतं खांद्यावर घ्यावं तसं तिला खांद्यावर टाकलं. ती हातपाय झटकत होती आणि त्या तरुणाला ओरडत होती.
आद्या,“ सोडा मला रुद्र… याच्या तर आईच्याxxxx थांब तू तिथंच मी आलेच. सोडा मला रुद्र! चुकीचा माफी नाही!”
रुद्राक्ष तिला काहीच बोलला नाही आणि नेऊन त्याने तिला कारचे मागच्या सीटचे दार उघडून आत जवळजवळ कोंबल आणि दार लावून घेतलं. ड्रायव्हर त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता. आधीच विकनेस आलेला रुद्राक्ष तिला उचलून आणून चांगलाच दमला होता. तो गाडीत पुढे बसला.
रुद्राक्ष,“ ड्रायव्हर घरी चल.” तो रागानेच म्हणाला आणि गाडी सुरू झाली.
आद्या,“ का आणलं मला तुम्ही असं उचलून? त्याच थोबाड फोडायचं होतं मला.” ती रागाने ओरडली.
रुद्राक्ष,“ आद्या sss झाला तेव्हढा तमाशा पुरे झाला. यु फुलीश गर्ल! त्या मुलाची काही चूक नव्हती. तुझं लक्ष माझ्याकडं होतं आणि तूच त्याला धडकलीस तरी तो सॉरी म्हणाला.तरी ही तू त्याच्याशी भांडत होतीस. जंगली कुठली! इडियट!” तो रागाने तणतणत होता पण त्याला आता चांगलाच दम लागला होता.
आद्या,“ जास्त बोलायचं नाही. हो आहे मी जंगली. आणि तसल्या इंग्लिश शिव्या मला नाही द्यायच्या. आलाय मोठा फॉरेनमधून शिकून. बिनडोक साला. उचलून घेऊन आला मला! त्या तींपाटाला तर चांगला धुतला असता आज.” ती रागाने नुसती धुमसत होती. आपण काय बोलतोय तिला स्वतःला ही कळत नव्हतं.
रुद्राक्ष,“ शट युअर माऊथ!” तो रागाने ओरडला आणि आता त्याचा श्वास अडकल्याने त्याला ठसका लागला.
डायव्हर,“साहेब पाणी प्या. मॅडम प्लिज थोडं शांत व्हा ना.” इतका वेळ चाललेलं दोघांचा भांडण पाहून तो आता बोलला आणि त्याने पाण्याची बाटली रुद्राक्षच्या हातात दिली. तसं आद्या गप्प बसली.
रुद्राक्ष रागाने पाय आपटतच घरात आला. आद्याच ही तोंड फुगलेलं होतं. सविता हॉलमध्येच रत्नमालाबाईंबरोबर बसली होती. सविताला पाहून रुद्राक्षचा राग अजूनच उफाकून आला.
रुद्राक्ष,“ मॉम या मुलीला इथून पुढं कुठं घेऊन जा म्हणायचं नाही मला. मी कुठेच घेऊन जाणार नाही हिला. मॅनर्सलेस, जंगली कुठली!” तो रागाने तणतणला.
आद्या,“ मला ही हौस नाही तुमच्या बरोबर फिरायची. आणि एक्स क्युज मी! पुन्हा मला जंगली नाही म्हणायचं. हे आले मोठे सोफिस्टीकेटेड!” ती ही रागाने म्हणाली
रुद्राक्ष काहीच न बोलता तोंड फुगवून रूममध्ये निघून गेला तर आद्या बाहेर पोर्चमध्ये झोपाळ्यावर बसली. सविता आणि रत्नमालाबाई नुसतं दोघांच भांडण पाहत आणि ऐकत होत्या.
एक है आग
तो दूजा है पानी
अब कैसे बनेगी दोनों की अनोखी प्रेम कहानी!😂😂
खरंच तर होतं आद्याला जेंव्हा सत्य समजेल तेंव्हा काय होईल? कारण आद्याकडे चुकीला माफी नाही आणि रुद्राक्षने तर अक्षम्य गुन्हा केला होता.
©स्वामिनी चौगुले
